पान १४ साठी
करडई लागवडीसाठी महत्त्वाचे वाण
-------------------
नीलेश सदार, डॉ. आशिष बनकर, वैभव पाटील
--------------------------------------------------------
करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नसते. सिंचनाची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. तर दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. जमिनीस भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून करडई पिकास हलके पाणी देणे योग्य ठरते.
------------------
सरळ वाण /संकरित वाण---कालावधी (दिवस)---उत्पादन (क्विं./हे.)---वैशिष्ट्ये
भीमा---१३० ते १३५---१३ ते १५---कोरडवाहू क्षेत्रास योग्य
फुले-कुसुमा---१३५ ते १४०---१४–१६---कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य
एस.एस.एफ. ६५८---११५ ते १२०---१२ ते १३---बिन काटेरी, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी योग्य
एस.एस.एफ. ७०८---११५ ते १२०---कोरडवाहू १३ ते १५, बागायती २० ते २२---पश्चिम महाराष्ट्र लागवडीसाठी योग्य, कोरडवाहू तसेच बागायतीसाठी शिफारस
फुले करडई ७३३---१२० ते १२५---१३ ते १५---कोरडवाहू लागवडीसाठी
फुले चंद्रभागा (एस.एस.एफ. ७४८)---१३० ते १४०---कोरडवाहू १३ ते १५, बागायती २० ते २२---कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
फुले निरा (एस.एस.एफ. १२-४०)---१२० ते १२५---कोरडवाहू १३ ते १५, बागायती २० ते २२---तेलाचे प्रमाण अधिक (३२.९%), अखिल भारतीय स्तरावर कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी शिफारस
फुले भिवरा (एस.एस.एफ. १३-७१)---१२० ते १२५---कोरडवाहू १५ ते १६, बागायती २२ ते २५---कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मर रोग व मावा किडीस मध्यम प्रतिकारक.
फुले गोल्ड (एस.एस.एफ. १५-६५)---१२० ते १२५---कोरडवाहू १५ ते १७, बागायती २० ते २२---तेलाचे प्रमाण अधिक (३४.६%), कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
फुले किरण(एस.एस.एफ.१६-०२)---१२५ ते १३०---कोरडवाहू १५ ते १७, बागायती २० ते २५---तेलाचे प्रमाण ३०.५%, कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी
पी.बी.एन.एस. १२---१३५ ते १३७---१२ ते १५---कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मावा किडीस मध्यम प्रतिकारक
नारी ६---१३० ते १३५---१० ते १२---बिन काटेरी, पाळ्या गोळा करण्यास योग्य
अकोला पिंक---१२० ते १२५---१२ ते १५---विदर्भात लागवडीसाठी प्रसारित
फुले भूमी (एस.एस.एफ. १८-०२)---१३५ ते १४०---कोरडवाहू १३ ते १६, बागायती २० ते २५---कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी योग्य, मावा किडीस व करपा रोगास मध्यम प्रतिकारक्षम
----------------------------------
- नीलेश सदार, ९५२७२०२१२६
(कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.