पुणे

चार दिवसांत साडेसहा हजार टन कचरा संकलन!

CD

पिंपरी, ता. ५ : गणेश विसर्जन काळात शहरातून अवघ्या चार दिवसांत सहा हजार ५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. रस्ते, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाटांची स्वच्छता झाली; मात्र संकलित कचऱ्यावर प्रक्रिया न करताच मोशी डेपोत साठवण्यात आला. त्यामुळे डेपोवरील भार कमी करण्यासाठी दहा ठिकाणी विकेंद्रित कचरा व्यवस्थापन सुविधा प्रस्तावित असताना त्यांच्या अंमलबजावणीचे वेळापत्रकही महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान शहरातून सहा हजार ५०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. याशिवाय २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. स्वच्छतेसाठी तीन हजारांहून अधिक सफाई सेवक कार्यरत होते. गर्दीच्या काळातही कचरा तातडीने हटविण्यासाठी घाट आणि मिरवणूक मार्गांवर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. या चार दिवसांतील कचरा संकलनाची सरासरी प्रतिदिन एक हजार ६२५ टन होते.
मोशी डेपोवरील कचऱ्याचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील दहा जागा प्रस्तावित केल्या आहेत. निगडी सेक्टर २२, चिंचवड, दत्तनगर, दिघी गायरान, चोविसावाडी, पुनावळे आणि गवळीमाथा येथील जागांचा त्यात समावेश आहे. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागेबाबतही चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाने सप्टेंबरमध्ये सांगितले होते. जागांच्या क्षेत्रफळानुसार वर्गीकरण, पुनर्वापर, बायोगॅस आणि अन्य सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. या केंद्रांची अंतिम जागानिश्चिती, प्रक्रिया क्षमता आणि काम सुरू करण्याच्या तारखा स्पष्ट होणे आवश्यक आहे. स्थानिकांना प्रकल्पाचे स्वरूप, दुर्गंधी नियंत्रण, सांडपाण्याची व्यवस्था आणि कचरा वाहतुकीबाबत माहिती देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

कचरा संकलनाचा हिशेब
- ६,५०० मेट्रिक टन : २२ ते २५ सप्टेंबरमधील कचरा संकलन
- २९४.६५५ मेट्रिक टन : स्वतंत्र निर्माल्य संकलन
- ३,००० हून अधिक : स्वच्छतेसाठी कार्यरत सफाई सेवक
- १० ठिकाणे : विकेंद्रित कचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित जागा

प्रस्तावित जागांची तांत्रिक तपासणी करून संबंधितांच्या संमतीने अंतिम निश्चिती केली जाईल. पर्यावरणपूरक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT