पुणे

अभिजात मराठी भाषा व साहित्यावर कराडमध्ये परिसंवाद

CD

मराठी संवर्धनासाठी हवेत सामूहिक प्रयत्न

कऱ्हाडला अभिजात मराठी भाषा व साहित्यावर परिसंवाद

कऱ्हाड, ता. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा समृद्ध इतिहास, साहित्यिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा जागर करण्याच्या उद्देशाने येथे ‘अभिजात मराठी भाषा आणि साहित्य’ या विषयावर विशेष परिसंवाद उत्साहात झाला. शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविण्यासह नव्या पिढीत भाषेविषयी अभिमान व आत्मीयता निर्माण करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद झाला. माजी मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, अल्ताफहुसेन मुल्ला, अरुण पाटील, संजय बदीयानी, प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव, प्राचार्य डॉ. एस. एच. बुरुंगले उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी ‘अभिजात मराठी भाषा : वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. मराठी भाषेचा प्राचीन वारसा, तिची साहित्यिक समृद्धी आणि बदलत्या काळातील आव्हाने यांचा त्यांनी आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हा केवळ सन्मान नसून भाषा संवर्धनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेची स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा आणि तिच्या प्राचीनत्वाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ. सुनील सावंत यांनी ‘मराठी अनुवाद परंपरा’ या विषयावर विचार मांडले. अनुवादामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळते, असे त्यांनी सांगितले. प्रा. अविनाश सप्रे यांनी ‘भारतीय भाषा आणि साहित्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना विविध भारतीय भाषांमधील साहित्यिक देवाणघेवाणीचे महत्त्व सांगितले.
बाळासाहेब पाटील यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. भाषेचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून शिक्षण, संशोधन, प्रशासन, तंत्रज्ञान आणि दैनंदिन व्यवहारांत मराठीचा वापर वाढला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. अरविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. मृणालिनी शिंदे, विद्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक जाधव यांनी आभार मानले.

W56262
कऱ्हाड ः परिसंवादात बोलताना बाळासाहेब पाटील. त्यावेळी डॉ. शामकांत देवरे, ए. एन. मुल्ला, अरुण पाटील आदी.
.............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : पुण्यात एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा नकार; जागा तातडीने रिकामी करण्याचे आदेश

नाना पाटेकरांच्या आठवणीत Eknath Shinde भावूक, काय म्हणाले ?

Latest Marathi News Live Update: कचनेर तांड्यात गांजाची शेती उघडकीस; २४१ झाडे जप्त

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

SCROLL FOR NEXT