विक्रमसिंह पाटणकरांचा वाढदिवस उत्साहात
पाटण, ता. २७ ः राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८२ वा वाढदिवस विविध सामाजिक, कार्यक्रम शिबिरे, स्पर्धा आदींच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी विक्रमसिंह पाटणकर यांना स्नुषा यशस्विनीदेवी पाटणकर, ऐश्वर्यादेवी पाटणकर आदींनी औक्षण केले. यावेळी दीपकसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटी सचिव अमरसिंह पाटणकर, भाजप राज्य परिषद सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, उद्योजक याज्ञसेन पाटणकर, विजयेंद्र पाटणकर, अर्जुनसिंह पाटणकर, समरजित पाटणकर, रघुवीर पाटणकर, महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शीलादेवी पाटणकर, रेखादेवी पाटणकर आदी कुटुंबीय उपस्थित होते.
सकाळी देवदर्शन घेतल्यानंतर त्यांनी ‘शिक्का मॅन्शन’ या निवासस्थानी उपस्थित मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्यक्ष भेटून खासदार उदयनराजे भोसले, टाटा कामगार युनियनचे सुजित पाटील, उद्योजक संजय शिंदे, सकस उद्योग समूहाचे व्यवस्थापक राजेंद्र कदम, राजाभाऊ शेलार, प्रतापराव देसाई, नगराध्यक्षा अनिता देवकांत, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पूजा कदम, बाळा कदम, मोहनराव पाटील, हिंदुराव पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
दूरध्वनीवरून सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, खासदार नितीन पाटील, विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, सुनील काटकर, जिल्हा बँकेचे राजेंद्र सरकाळे आदींनी शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक उमेश टोळे, स्वप्नील माने, जगदीश शेंडे, किशोर गायकवाड, संतोष पवार, सागर पोतदार, नगरसेविका सुषमा मोरे, संजना जवारी, सोनम फुटाणे, संज्योती जगताप, मिनाज मोकाशी, मंगल कांबळे, स्वीकृत नगरसेवक डॉ. नितीन गायकवाड, संजय इंगवले, पाटण अर्बन बँक अध्यक्ष चंद्रकांत कापसे, उपाध्यक्ष दिलीपराव मोटे, दिनकरराव घाडगे, सरव्यवस्थापक माधव कपिलेश्वर, व्यवस्थापक के. आर. शिंदे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश जानुगडे, उपाध्यक्ष महेंद्र मगर, व्यवस्थापक रणजित पाटणकर, तालुका दूध संघ अध्यक्ष सुभाषराव पवार, उपाध्यक्ष शांताराम सूर्यवंशी, व्यवस्थापक शिवाजीराव सूर्यवंशी, कोयना एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, श्रीराम नागरी पतसंस्था अध्यक्ष हिंदुराव सुतार, उपाध्यक्ष बजरंग प्रभाळे, सरव्यवस्थापक लहू माने, दीपकसिंह पाटणकर, विलासराव क्षीरसागर, जयवंतराव पवार, कऱ्हाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र डुबल, सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, प्राचार्य शिरीष पवार, भाजपचे मंडलाध्यक्ष रविराज पाटील, श्रीकांतशेठ फुटाणे, अक्षय फुटाणे, डॉ. रितेश राऊत, अविनाश पाटील, स्वीय सहाय्यक विजय कदम, शंकर पवार, पत्रकार जालिंदर सत्रे, विलास माने, यशवंतदत्त बेंद्रे, अरुण गुरव आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, रक्तदान, आरोग्य शिबिरे व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
----------------------------
01181
पाटण : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना शुभेच्छा देताना कार्यकर्ते.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.