पुणे

विरमाडे फाट्यावर मृत्यूचा सापळा; महिन्यात तिघांचा बळी, सुरक्षित मार्गाची ग्रामस्थांची मागणी

CD

विरमाडे फाट्यावर मृत्यूचा सापळा

महिन्यात तिघांचा अपघाती मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांतून संताप

प्रशांत गुजर ः सकाळ वृत्तसेवा
आनेवाडी, ता. १२ : पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यालगतच्या विरमाडे फाट्यावर रस्ता ओलांडणे ग्रामस्थांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. पर्यायी सुरक्षित मार्गाचा अभाव, अपुरा भुयारी मार्ग आणि भरधाव वेगाने धावणारी वाहनांमुळे येथे अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या एका महिन्यात तीन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. टोलनाक्याच्या अगदी जवळ असलेल्या विरमाडे गावासाठी कोणताही सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. येथे असलेला भुयारी मार्ग अत्यंत अरुंद असून, त्यात कायम चिखल साचलेला असतो. त्यामुळे बैलगाडी, ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांना तो मार्ग वापरणे शक्य होत नाही. परिणामी, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना थेट महामार्ग ओलांडूनच प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून पुणे व बंगळूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. वाहनांचा वेग प्रचंड असल्याने महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्ता ओलांडणे जोखमीचे ठरत आहे. अनेकांनी या ठिकाणी अपघातात प्राण गमावले असून, काही जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे.


इतर समस्यांनी वाढवली डोकेदुखी
विरमाडेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. काही वाहनचालक रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विशेषतः महिला व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याकडून येणारा मार्ग अरुंद असून, त्या ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.


कोट
विरमाडेहून कृष्णा नदीकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. स्मशानभूमीही त्याच बाजूला असल्याने येथे जाणे अपरिहार्य आहे. ज्येष्ठ नागरिक, तसेच शेतकरी शेतीच्या कामासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, महामार्ग ओलांडताना प्रत्येक वेळी जीव धोक्यात घालावा लागतो.
सचिन सोनावणे,
पोलिस पाटील, विरमाडे


फोटो ओळ: SAY26B02528
विरमाडे ः फाट्यावर महामार्ग ओलांडताना ग्रामस्थांना करावी लागणारी जीवघेणी कसरत. (प्रशांत गुजर; सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT