SGW25B09096 :
सांगोला : येथील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत व इतर.
जि.प., पं, स निवडणुकीत युतीचा निर्णय नेते घेतील
चेतनसिंह सावंत; सांगोल्यात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २८ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावरच लढवणार असल्याचा निर्धार भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला. मात्र, युती किंवा आघाडी करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सावंत यांनी संघटनात्मक मजबुतीवर भर दिला. जुने व नवे कार्यकर्ते यांचा समन्वय साधणे अत्यंत गरजेचे आहे. जुन्या कार्यकर्त्यांना विसरून चालणार नाही. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये यश मिळू शकते, असे ते म्हणाले.
या बैठकीस मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, दादासाहेब खरात, भाऊसाहेब रुपनर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, नंदकुमार दिघे, नवनाथ पवार तसेच जिल्हा, तालुका, शक्तीकेंद्र व बूथस्तरीय पदाधिकारी, नगरसेविका व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम ठेवत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून, आगामी काळात तालुकानिहाय दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांची रणनीती आखली जाईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.