पुणे

अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

CD
SKR26B02688 साक्री : अत्याचार प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार सोनवणे यांना देताना समाजबांधव. ------------ ‘धुळे अत्याचार प्रकरणातील संशयितयांवर कारवाई करा’ साक्री, ता. १६ : धुळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात साक्री तहसील कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक असून, संपूर्ण समाजमन हादरवणारी आहे. अशा अमानुष घटनांमुळे महिला व बालिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी माया मोरे, शुभांगी शिंदे, रोहिणी शिंदे, निलेश भामरे, रोशन येशी, सागर मांडोळे, ऋषी मांडोळे, गोकुळ मोरे, भटू चव्हाण, भूषण चव्हाण, सुनील शिंदे, संतोष शिंदे, महेश हरडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज, नेमकं काय घडलं?

टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

Latest Marathi News Update : जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपलं, पण आता काँग्रेसची भूमिका काय?

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

SCROLL FOR NEXT