पुणे

वाणेवाडीत मुलांची भरली वाचन जत्रा

CD

सोमेश्वरनगर, ता. १० : उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाइल आणि टीव्हीच्या विळख्यात अडकण्याऐवजी वाणेवाडी (ता. बारामती) येथील ३५ ते ४० शालेय मुले दररोज दोन तास पुस्तकांचे वाचन करत आहेत. ‘साद संवाद ग्रुप’ने १ मे पासून सुरू केलेल्या या उपक्रमाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘साद संवाद ग्रुप’च्या वतीने वाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ‘स्व. सिद्धांत जगताप बालवाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. १ मे ते १० जून या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत हे वाचनालय परिसरातील मुलांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. वाणेवाडीसह मुरूम आणि करंजेपूल येथील मुलेही येथे वाचनासाठी येत आहेत. वाचनालयाची रचना मुलांच्या आवडीनुसार करण्यात आली असून, भिंतींवर आकर्षक चित्रे आणि हाताला येतील अशा उंचीवर पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
सुमारे दोन हजार पुस्तकांच्या संग्रहातून मुले आपल्या आवडीचे पुस्तक निवडून शाळेच्या व्हरंड्यात किंवा झाडाखाली बसून वाचनाचा आनंद घेत आहेत. या उपक्रमात परिसरातील पुस्तकप्रेमीही सहभागी होत असून, ते मुलांना गोष्टी सांगणे किंवा अभिवाचन करून दाखवत आहेत. या उपक्रमाचे आता एका वाचन चळवळीत रूपांतर होत असून, आगामी काळात वाचलेल्या पुस्तकांवर आधारित विविध स्पर्धा घेण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: उर्विल पटेलची ऐतिहासिक खेळी! CSK ची मोठी झेप अन् लखनौ सुपर जायंट्स प्ले ऑफच्या शर्यतीतून OUT

महिला आणि बाल विकास विभागातील कामं डिजिटल होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

विजय यांच्या शपथविधीला आर्मी ड्रेसमध्ये CSKचा खेळाडू? अश्विनने घेतली फिरकी, संघानेही शेअर केला व्हिडीओ

Akshada Pawase Success Story: पेपर विक्रेत्याच्या मुलीची भरारी! अक्षदा दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम, प्रतिकूल परिस्थितीवर मात..

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

SCROLL FOR NEXT