पुणे

​खळदमध्ये जमिनीच्या वादातून तरुणीवर चाकूने हल्ला

CD

सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील खळद येथे जमिनीच्या वादातून २९ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करून तिला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी बाळासाहेब फुले, प्राची वाघमारे यांच्यासह आठ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुष्पांजली राजेंद्र पुणेकर (वय २९, रा. उंड्री, पुणे) यांची खळद येथील गट नं. ८३ मध्ये जमीन आहे. गुरुवारी (ता. ७) दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चोरीला गेलेला विद्युत मीटर पाहण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी तेथे उपस्थित महिलांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मज्जाव करत खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांचा चष्मा फुटला. ​मारहाण सुरू असताना बाळासाहेब फुले यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, तर प्राची वाघमारे हिने घरातून चाकू आणून पुष्पांजली यांच्या उजव्या हातावर वार केले. जखमी अवस्थेत फिर्यादीने सासवड गाठून पोलिसांत धाव घेतली. त्यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले असून, यापूर्वीही जमिनीच्या वादावरून तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT