पुणे

किरकोळ कारणावरून एसटी वाहकास मारहाण

CD


सासवड, ता. १२ : किरकोळ कारणावरून एसटी बस वाहकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन मुरलीधर फाटे (रा. वडकी, ता. हवेली) आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सासवड-पुणे मार्गावरील झेंडेवाडी (ता. पुरंदर) परिसरात मध्यरात्री घडली.
याप्रकरणी  वाहक जीवन हरिश्चंद्र चव्हाण (वय ३० रा. वाखरी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण हे बस घेऊन सासवडकडून पुण्याकडे निघाले होते. झेंडेवाडी हद्दीतील हॉटेल साईरूपजवळ आरोपींनी त्यांची क्रेटा मोटार (क्र. एमएच १२-व्हीव्ही ८३८७) बससमोर आडवी लावून थांबवली. आरोपी सचिन फाटे व त्याच्या साथीदारांनी चव्हाण यांची कॉलर धरून त्यांना बसबाहेर ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचे डोके एका कंटेनरच्या बोनेटवर दोनदा आदळले. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला दुखापत झाली असून डाव्या डोळ्याला सूज आली आहे.
मारहाणीदरम्यान वाहकाच्या खिशातील प्रवाशांच्या तिकिटांचे पैसेही रस्त्यावर पडले. या प्रकारामुळे प्रवाशांना बराच वेळ खोळंबून राहावे लागले. ​सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT