पुणे

युवक मेळावा

CD

अजित पवारांची भूमिका
जनतेपर्यंत पोचवा
युवक मेळाव्यात मानकर यांचे आवाहन
स्वारगेट, ता. ३ ः ‘राज्यात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे काम जोमाने सुरू आहे. पक्षाच्या विचारधारेला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचवण्यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात जोमाने कामाला लागावे,’ असे आवाहन अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केले.
युवक मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम उपस्थित होते. युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध १२० पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.
चाकणकर म्हणाल्या, ‘‘युवक संघटना महत्त्वाची शाखा आहे. या माध्यमातून तरुणांचे मजबूत संघटन केले पाहिजे. पक्षाची भूमिका घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजे.’’
चांदेरे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार, मानकर यांनी माझ्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी दिली आहे. सर्व युवकांना सोबत घेऊन पुण्यातून अजित पवार यांना ताकद देण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत.’’
या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, दत्तात्रय धनकवडे, बाळासाहेब बोडके, आप्पा रेणुसे, रूपाली ठोंबरे-पाटील आदी उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: भरधाव मोटारीच्या धडकेत कोथरूडच्या तरुणाचा अंत; संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भीषण अपघात!

समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांग

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

Laptop Safety Tips : काय तुम्हीपण गादीवर लॅपटॉप ठेऊन चार्ज करताय-काम करताय? आजपासून बंद करा 'या' ३ चुका, नाहीतर होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT