पुणे

कत्तलखाना बंद केल्याने खाटिक व्यावसायिक आक्रमक

CD

कॅन्टोन्मेंट, ता. ११ ः पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा कमेला कोंढवा येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद केल्याने लष्कर भागातील खाटिक व्यावसायिकांनी सोमवारी (ता. १०) कॅंटोन्मेंट कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्या १२५ वर्षांहून अधिक काळापासून कोंढवा येथे हा कत्तलखाना सुरू आहे.

कत्तलखाना बंद करून पुणे महापालिकेच्या कत्तलखान्यात कँटोन्मेंटच्या व्यावसायिकांकरिता सोय करावी, अशा विनंतीचे पत्र नुकतेच कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी महापालिका आरोग्य विभागाचे आयुक्त आशिष भारती यांना दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी २५ एप्रिल रोजी ठराव मान्य करून कॅन्टोन्मेंटच्या जनावरांची कटाई करण्याची अनुमती दिली होती. स्थायी समितीच्या ठरावात दरही निश्चित झाले आले. तसेच त्या जनावरांची घेऊन जाण्याची जबाबदारीही कँटोन्मेट बोर्डाची राहिल, असे पत्रक बोर्डाला महापालिकेने पाठवले होते. त्यानुसार बोर्डाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव पारित करून पाल यांनी जनावरांची वाहतूक करण्याची जबाबदारी खाटिक व्यावसायिकांची राहिलं आणि व्यावसायिकाने पालिकेला ठरलेला दर द्यावा, अशा आशयाचा अध्यादेश काढला आहे. या निर्णयाला खाटिक व्यावसायिकांनी विरोध दर्शवला आहे.

ऑल इंडिया जमियतुल कुरेश ॲक्शन कमिटीचे शहर अध्यक्ष हसन कुरेशी याबाबत म्हणाले, ‘‘महापालिकेचे दर आम्हाला परवडणारे नाहीत, कत्तलखाना बंद करणे म्हणजे आमच्या नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली आहे.’’ कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, पुणे शहर अध्यक्ष हसन कुरेशी, उपाध्यक्ष आरिफ कुरेशी, महमूदलाल कुरेशी, मुनव्वर कुरेशी आदी आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.

तीव्र आंदोलनाचा इशारा
या निर्णयाविरुद्ध आम्ही न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कत्तलखाना बंद करणे हे न्यायाला धरून नाही. त्यामुळे कत्तलखाना परस्पर बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा कमिटीने पत्रकाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT