Attack on anti-encroachment squad in Kharadi esakal
पुणे

Pune Crime : खराडीत अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला

खराडीत कारवाई करताना पोलिस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांनी महापालिकेच्या पथकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : पुणे महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या अतिक्रमणविरोधी पथकावर काही अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी मंगळवारी खराडीत हल्ला केला. यातील पाच संशयितांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे (वय २४, रा बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब किसन गायसमुद्रे (वय ४९), सुमीत सुनील गिरी (वय २१), शेखर बाळासाहेब गायसमुद्रे (वय २१), सुनील बंडू गिरी (वय ४५) व गणेश बाळासाहेब गायसमुद्रे (वय १९, सर्व रा. खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.

अतिक्रमण निरीक्षक भीमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुणाल मुंडे आणि त्यांचे सहकारी वडगाव शेरी, विमाननगर आणि खराडीतील पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई करीत होते. खराडीतील स्वीट इंडिया चौकात हे पथक दाखल झाल्यानंतर संशयितांनी कारवाईला विरोध केला. तसेच, पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

खराडीत कारवाई करताना पोलिस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांनी महापालिकेच्या पथकावर हल्ला केला. या पथकासोबत पोलिस बंदोबस्त मिळाल्यास कारवाई करणे सोपे जाईल.
- भीमाजी शिंदे, अतिक्रमण निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT