pune dam water update Khadakwasla Dam Water storage 74 percent monson rain Sakal
पुणे

Khadakwasla Dam Water level : खडकवासला प्रकल्पातील धरणांत ७४.९२ टक्के पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पातील धरणांत २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासांत १२७८ दशलक्ष घनफूट येवा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी चार ही धरणांतील पाण्याचा येवा (आवक) कमी झाला आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्यात होणारी वाढ कमी झाली आहे.

खडकवासला प्रकल्पातील धरणांत २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासांत १२७८ दशलक्ष घनफूट येवा(आवक) झाला होता.

मागील काही दिवस ९०० ते ८०० दशलक्ष घनफूटपर्यंत होता. शनिवारी सकाळी मागील २४ तासांतील येवा ७५१ दशलक्ष घनफूट होता. शुक्रवारी ११ तासांत २७९ होता, शनिवारी अकरा तासात १८१ दशलक्ष घनफूट होता. म्हणजे पाणी जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

खडकवासला धरणातून शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४२८ क्युसेक पाणी मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरण शंभर टक्के भरले की, जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने सांगितले.
शनिवारी दिवसभरात खडकवासला येथे दोन, पानशेत येथे चार, वरसगाव येथे आठ, टेमघर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी) / उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी
खडकवासला- १.९७ / १.९३ / ९७.७०
पानशेत- १०.६५ / ८.५५ / ८०.२५
वरसगाव- १२.८२ / ९.३४ / ७२.८४
टेमघर- ३.७१ / २.०३ / ५४.६९

चार धरणातील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी
शनिवारचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २१.८४ टीएमसी म्हणजे ७४.९२ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT