पुणे

राजीव गांधींचे निर्णय अनेक पिढ्यांसाठी फलदायी

CD

कात्रज, ता. २१ : राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून काम करताना असंख्य उल्लेखनीय निर्णय घेतले. त्यातील युवा वर्गासाठी जे निर्णय घेतले, ते पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी ठरणारे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांनी केले. भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कात्रज येथील त्यांच्या पुतळ्यास जोशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जोशी म्हणाले की, युवकांमध्ये प्रखर राष्ट्रभावना आणि नवचैतन्य निर्माण व्हावे, यासाठी राजीव यांनी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याची प्रथा देशभर सुरू केली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी केले. राजीव गांधींचे उमदे नेतृत्व देशास अधिक काळ लाभले असते, तर देशाचा चेहरा मोहरा अनेक अर्थाने बदलला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी मिलिंद गुंजाळ, राजीव जगताप, दिलीप गरुड, रामचंद्र शेडगे, संदीपान पवार, डॉ. राजकुमार जाधव, अविनाश गोडबोले, राहुल मते आदी उपस्थित होते. स्मारक समिती सदस्य सुभाष थोरवे, संजय अभंग, धनंजय भिलारे, रमेश सोनकांबळे, गणेश मोरे यांनी उपस्थितांचे तुळशीचे रोप व पुस्तके देऊन स्वागत केले. ॲड. फैयाज शेख यांनी आभार मानले.

कात्रज ः राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कात्रज येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना विविध मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT