पुणे

शहरात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन

CD

पुणे, ता. ३ ः येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लुपनगर रोड याठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करून संविधान गौरव समितीने आंदोलन केले. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी महाडचे चवदार तळे या पवित्र ठिकाणी सत्याग्रह केला. त्याचठिकाणी आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडून बाबासाहेबांचा अपमान केला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत, असे मत या वेळी आंदोलकांनी व भीमभक्तांनी व्यक्त केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे, निरंजन कांबळे, विकास सोनवणे, नितीन जाधव, विपुल रोकडे, उमर सय्यद, दत्ता भालशंकर, वैभव पवार यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान, वडगावशेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात निषेध आंदोलन करण्यात आला. सुरुवातीला बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी माजी नगरसेवक सतीश म्हस्के, राजेंद्र खांदवे, सुशांत माने, कुलदीप शर्मा, अमोल खांदवे, रवी देवकर, शशी टिंगरे आदी उपस्थित होते. या वेळी काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सतीश म्हस्के म्हणाले की, ज्या राज्यघटनेवर देश चालतो, त्या राज्यघटनेच्या निर्मात्याचा फोटो फाडणे, हे एका आमदाराला शोभण्यासारखे कृत्य नाही. तर राजेंद्र खांदवे म्हणाले की, ही घटना अतिशय खेदजनक व संतापजनक आहे. याचा तीव्र निषेध आहे.

येरवडा ः जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करताना संविधान गौरव समितीचे कार्यकर्ते.
विश्रांतवाडी ः जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev यांनी असे मत का व्यक्त केले? विराट कोहलीबद्दलही केले विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT