पुणे

खेसे पार्कमध्ये मध्यरात्रीपर्यंत वाहतूककोंडी

CD

वडगाव शेरी, ता. ५ ः मुसळधार पावसामुळे लोहगाव परिसरातील खेसे पार्क येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे धानोरीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. रस्त्यात अनेक वाहने बंद पडल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे लोहगावच्या दिशेने आणि विमानतळाच्या दिशेने वाहतूककोंडी वाढत गेली.
विमाननगर येथून कलवडमार्गे धानोरीला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथील ओढ्याला मोठा पूर आल्याने सर्व वाहतूक खेसे पार्कमधून जाण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, खेसे पार्कमध्ये आल्यानंतर येथील रस्ताही बंद असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर गाड्या माघारी वळून जाण्याच्या प्रयत्नात प्रचंड वाहतूककोंडी झाली. विमानतळासमोर एरो मॉलसमोरच्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मध्यरात्री या चौकातही मोठी कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी काही कार्यकर्ते वगळता पोलिस कोठेही दिसले नाहीत.
हवाई दलाने आपल्या मिळकती सीमा भिंत घालून बंदिस्त केल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह अडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना कलवड, खेसे पार्क, धानोरी परिसरात समोर येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT