पुणे

खंडित वीजपुरवठ्याने वारजेकर हैराण

CD

खडकवासला, ता. ५ : वारज्यातील तपोधाम सोसायटी आणि परिसरात पावसामुळे मंगळवारी (ता. ४) सायंकाळी वीजवाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली.
तपोधाम परिसर, नवचैतन्य सोसायटी, वसंत कमलविहार, लभडे गार्डन, वरदायिनी अशा सोसायट्या अक्षरशः रात्रभर अंधारात होत्या. सध्या उन्हाळा सुरू असल्याने उकाडा वाढत आहे. डासांचा प्रादुर्भावदेखील परिसरात आहे. परिसरात मंगळवारी सायंकाळी पाऊस पडला. त्यानंतर साडेसात वाजता वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे प्रवाह खंडित झाला. महावितरणकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी बिघाड शोधून रात्री नऊ वाजता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. वीजप्रवाह दोन तासांत सुरळीत होण्याची शक्यता महावितरणने वर्तविली होती. परंतु रात्री साडेअकरा वाजले तरी प्रवाह सुरू झाला नव्हता. बिघाड कुठे आहे, हे शोधत संबंधित सोसायटीतील नागरिक तेथे पोचले.
पुण्यात २४ तास वीजपुरवठा मिळावा, म्हणून जास्त वीज दर आकारले जातात. जादा वीज दर देऊन ही नागरिकांवर अशी वेळ येणार असेल तर काय करायचे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. या भागात बऱ्याच जुन्या वीजवाहिन्या असल्याने असे प्रकार वारंवार घडतात. महावितरणने यात लक्ष घालून नवीन वाहिन्या टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे परिसरात मंगळवारी वीजपुरवठ्यासंदर्भात सुमारे ५०हून तक्रारी होत्या. तपोधाम परिसरात भूमिगत वीजवाहिनीतील दोष शोधण्यात तीन-चार वेळा तपासणी करावी लागली. या परिसरात वाहिनी जवळ लोखंडी वाहिनी असल्यामुळे अडचणी येत होत्या. बुधवार सकाळी काम पूर्ण झाले, अशी माहिती कोथरूडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील गवळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

SCROLL FOR NEXT