औंध, ता. १५ ः येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) नव्याने स्थापन केलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन रविवारी (ता. १५) झाले. या वेळी उपसंचालक तथा सहसंचालक रमाकांत भावसार, ॲड. मधुकर मुसळे, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार, मागासवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम गाणार, औंध रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र शेलार, औंध आयटीआयचे उपप्राचार्य भिलेगावकर आदी उपस्थित होते.
‘‘संविधान म्हणजे १४० कोटी देशवासीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवणारा ग्रंथ आहे,’’ असे मत उपप्राचार्य प्रकाश पवार यांनी व्यक्त केले. ‘‘संविधानामध्ये मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये हे दोन्ही आहेत. परंतु, आपण अधिकारासाठी भांडतो, तर कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो,’’ असे ॲड. मधुकर मुसळे म्हणाले.
‘‘कामगारांनी अन्यायाविरुद्ध लढण्याकरिता संविधानाचा अभ्यास करावा,’’ असे पुरुषोत्तम गाणार म्हणाले. सूत्रसंचालन संतोष गुरव, प्रियांका वाघमारे यांनी केले. सुनील तुपलोंढे, प्रियदर्शिनी शिंदे यांनी नियोजन केले. श्रीकांत मुरटे, राजेंद्र गरदडे यांनी दूरदृष्यप्रणालीचे व्यवस्थापन केले. कमलेश पवार यांनी आभार मानले.
औंध : ‘आयटीआय’मध्ये संविधान मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.