पुणे

टिंगरे यांनी आणला सर्वाधिक विकासनिधी ः अजित पवार

CD

वडगाव शेरी, ता. १७ ः ‘‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल करून राज्यघटना बदलली जाणार असल्याची अफवा पसरवली. तसेच अल्पसंख्याकांना भीती दाखवली. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. परंतु आता जनता सुज्ञ झाली आहे. वडगाव शेरी मतदारसंघात आजपर्यंत शक्य झाला नाही इतका मोठा विकासनिधी टिंगरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडगाव शेरी येथे सांगितले.
महायुतीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी भाजपचे जगदीश मुळीक तसेच महायुतीतील विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजासाठी ‘बार्टी’च्या धरतीवर ‘मार्टी’ स्थापन करणार व भरीव निधी उपलब्ध करून अल्पसंख्याकांचा विकास साधला जाईल. तसेच चंद्र-सूर्य असेपर्यंत भारतीय राज्यघटनेला कोणी धक्का लावू शकत नाहीस, असे अजित पवार म्हणाले. मतदारसंघात टँकरचा व्यवसाय करणाऱ्यांना हद्दपार करू, असा मी शब्द देतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
टिंगरे म्हणाले, ‘‘महायुती सरकारच्या माध्यमातून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे परिसरात मोठा विकास झाला आहे. मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी या सर्व समस्या येत्या काळात सोडविणार आहे.’’ मुळीक यांनीही टिंगरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी पुणे ते दुबई विमान रद्द

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

SCROLL FOR NEXT