पुणे

दुधाच्या दरात होणार दोन रुपयांची वाढ

CD

कात्रज, ता. १४ : महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही २ रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विविध सहकारीसह खासगी संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत पनीरातील भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याबाबत, अन्न व औषध प्रशासन मंत्री, अधिकारी व दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन भेसळखोरांवर कडक कारवाईची मागणी करण्याबाबत चर्चा झाली. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, श्रीपाद चितळे व पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे उपस्थित होते.

दोन रुपयांप्रमाणे दरवाढीचा निर्णय एक मताने झाला आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. वाढीव दर हे १५ मार्चपासून लागू होतील.
- प्रकाश कुतवळ, मानद सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ

सध्याचे दर- वाढीव दर
गाईचे दूध-५४ ते ५६ रुपये-५६ ते ५८ रुपये
म्हशीचे दूध-७० ते ७२ रुपये-७२ ते ७४ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT