वाघोली, ता. १८ : घरात आई काम सांगते म्हणून घरातून शाळेत न जाता निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना चंदननगर पोलिसांनी तासाभरात शोधून पालकांकडे सुपूर्द केले. मुलींना शोधण्यात मदत करणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांचा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.
दोघींचे वय १३ वर्षे. एकाच वर्गात शिकणाऱ्या. मंगळवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. मात्र शाळेत न जाता त्या दुसरीकडे निघून गेल्या. शाळेतील शिक्षकांनी मुली आज शाळेत आल्या नसल्याचे पालकांना कळविले. पालकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आढळून आल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी तत्काळ पथक नेमून त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यातील एकीकडे मोबाईल असल्याचे त्यांना कळले. त्यांनी सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनवरून त्या रिक्षाने पुण्यात फिरत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी अखेर त्यांना कसबा पेठेत गाठले. त्यांना परत आणून पालकांच्या ताब्यात दिले.
मुलींनी चौदा हजार रुपये सोबत नेले होते. पोलिसांना मदत करणारे रिक्षाचालक संतोष लोखंडे आणि कृष्णा नागपुरे यांचा सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक किरण मोरे, अंमलदार विजय टिकेकर, रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, अमोल कोळेकर, भारत उकिर्डे, शिवाजी धांडे, मनोज भंडारी, अतुल आदक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.