पुणे

‘तनिष्कां’नी शिकविला नराधमाला धडा

CD

पुणे, ता. २५ : आंबेगाव परिसरातील एक सोसायटीत ४५ वर्षांची व्यक्ती अल्पवयीन मुलीला ‘नको तो’ त्रास देतो, त्यातून व्यथित झालेली पीडित मुलगी तिच्या पालकांसह ‘सकाळ’च्या ‘तनिष्का व्यासपीठा’कडे येते. त्यातूनच तनिष्कांना केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिस त्या व्यक्तीला तत्काळ अटक करतात. त्यामुळे संबंधित कुटुंबाला आधार मिळतो.
‘तनिष्का’ व्यासपीठाच्या वतीने समुपदेशन केले जाते. त्याअंतर्गत ही घटना तनिष्कांना ही घटना समजली. आंबेगावात कैलास देशमुख (वय ३५) हा एका सोसायटीत राहत होता. एका कुटुंबाशी त्याचा कोरोनाकाळात चांगला घरोबा झाला. मुले खेळताना त्याने अल्पवयीन मुलीचे फोटो काढले आणि तिला धमकावून बळजबरी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या मुलीला काही गोष्टी कळत नव्हत्या. मात्र नंतर हळूहळू तो त्रास तिला जाणवू लागला. त्यातून ती नैराश्यात गेली. संबंधित घटना तिने आपल्या मित्रांना सांगितली आणि त्यांच्या मदतीने घरच्यांशी संवाद साधला. त्यातूनच ही माहिती तनिष्कांना समजली आणि त्यांनी तज्ज्ञ समुपदेशकांच्या मदतीने पुढील कार्यवाही केली.
तनिष्का गटप्रमुख इंदिरा अहिरे आणि सदस्या संगीता इंगळे, सुमन सातपुते, मंगल साळुंखे यांनी मुलीच्या आई-वडिलांसह आंबेगाव ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे यांच्या मदतीने तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ सूत्र फिरवून देशमुखला छत्रपती संभाजीनगरजवळ अटक केली.

समुपदेशनातून ही घटना समोर आली. संबंधित मुलीला आणि तिच्या पालकांना आम्ही धीर देऊन पाठबळ दिले. पोलिसांकडे पाठपुरावा केल्याने त्या व्यक्तीला अटक झाली. या घटनेत पोलिसांनी चांगले सहकार्य केले.
- इंदिरा अहिरे, तनिष्का गटप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT