पुणे

मुनोत शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक

CD

कात्रज, ता. १६ ः शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी कात्रज-कोंढवा रस्ता येथील मुनोत प्राथमिक विद्यालय बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी काही काळ कात्रज-कोंढवा रस्ता अडविला. त्यामुळे काही काळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला.
संस्थाचालक आणि शिक्षकांतील वाद मिटवून घ्यावा. दोघांनीही समन्वय साधून शाळा सुरु करावी, अशी मागणी पालकांतून यावेळी करण्यात आली.
मे महिन्यात निकालाच्या दिवशीच शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थाचालकांनी पालकांना सांगितला होता. मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने संस्थाचालकांनी शाळा सुरू करावी, अशी मागणी करत विद्यार्थी व पालकांनी घोषणाबाजी केली. तसेच, संस्थाचालकांनी शिक्षणविभागालाही शाळा बंद करण्याचा निर्णय कळविल्यानंतर शिक्षण विभागांकडूनही शाळेचे समायोजन किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यावर ही वेळ आल्याचे पालकांनी सांगितले.
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने आदी यावेळी उपस्थित होते.
-----------
‘‘संस्थाचालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम आम्ही करत आहोत. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु आहेत. शाळा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ.
----------
फोटो ः 68359

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: स्वप्नपूर्तीचा आनंद ; वैभव सूर्यवंशी; भारतीय संघात निवड झाल्यानंतर युवा फलंदाज भावुक

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT