पुणे

आता आरक्षणाशिवाय माघार नाही ः मनोज जरांगे पाटील

CD

वाघोली, ता. २० : ‘‘मुंबईत यावेळी करोडोच्या संख्येने मराठा बांधव धडकतील. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,’’ असा स्पष्ट इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वाघोलीमध्ये दिला.
मराठा बांधव आंदोलन करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. या आंदोलनाविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील रविवारी (ता. २०) वाघोलीत आले होते. येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी दिवसभर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होती. जरांगे पाटील म्हणाले, ‘‘आता सरकारशी कोणतीही चर्चा नाही. दीड वर्षे चर्चाच करत आहे. ज्या मराठा समाजाच्या जिवावर सरकार निवडून आले, त्यांच्या प्रश्नांसाठी सरकारकडे वेळ नाही. त्यामुळे आता आम्हीच मुंबईकडे कूच करणार आहोत. सरकारकडे दोन वर्षांपासून शांततेत मागणी करूनही आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्याने मुंबईला येण्याची वेळ सरकारने आणली. मुंबईत जागा पुरणार नाही, एवढे मराठे येतील आणि मराठा बांधव आरक्षण घेऊनच परत येतील. चर्चेचा मार्ग आता नाही. शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. याला विरोध करण्याचा किंवा मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न सरकारने चुकूनही करू नये.’’
‘‘मराठा बांधव २९ ऑगस्टपासून अंतरवाली ते पैठणमार्गे शेवगाववरून अहिल्यानगर, आळे फाटामार्गे जुन्नर शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेज घाटातून कल्याण, चेंबूरमार्गे मुंबईला जातील,’’ असे जरांगे पाटील यांनी सांगितले. यावेळी विविध संघटनांनी पत्राद्वारे त्यांना पाठिंबा दर्शविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fighter Jet Crash: मोठी बातमी! बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, एकाचा मृत्यू, अनेक जखमी, Video Viral

अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण? 'सैय्यारा'मधील गाजलेल्या 'या' जेन झी जोडीविषयी जाणून घ्या सर्वकाही

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल

Video : मैत्रीण दुबईत पोहोचली अन् मी अजून ट्रॅफिकमध्येच... बंगळुरुमधील महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT