पुणे

अपघातानंतर भरपाईसाठी कुटुंबीयांस मारहाण वाघोलीतील घटना ः मुलाच्या अपहरणाची धमकी

CD

वाघोली, ता. २० ः वाघोली परिसरात मोटारीच्या अपघातानंतर नुकसानभरपाईची मागणी करून चालकासह कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. तसेच, दहा वर्षांच्या मुलाला पळविण्याची धमकी दिली. पुणे-नगर महामार्गावरील डी कॅथलॉनसमोर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
आयव्ही इस्टेटमधील एका कुटुंबातील १० वर्षांचा मुलगा आणि मोटारचालक घराकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या स्विफ्ट मोटारीने त्यांच्या मर्सिडिझ मोटारीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर स्विफ्टमधील तिघांनी मर्सिडिझच्या चालकाशी वाद घालून नुकसान भरपाईची मागणी केली. त्याला मारहाण करत, मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर तिघांनी २० ते २५ जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. घाबरलेल्या मुलाने आई-वडिलांना फोन केला. आई, वडील व इतर नातेवाईक घटनास्थळी पोचताच त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ‘भरपाई दिली नाही, तर मुलाला घेऊन जातो’ अशी धमकी दिली. पोलिसांकडे गेल्यास जीवे मारू, अशी धमकीही दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संदीप करपे यांनी दिली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहान पांडे आणि अनित पड्डा आहेत तरी कोण? 'सैय्यारा'मधील गाजलेल्या 'या' जेन झी जोडीविषयी जाणून घ्या सर्वकाही

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

Harbhajan Singh: 'तूच माझ्या बाबाला मारलंस ना?' जेव्हा श्रीसंतच्या मुलीने हरभजनला केला थेट सवाल

Video : मैत्रीण दुबईत पोहोचली अन् मी अजून ट्रॅफिकमध्येच... बंगळुरुमधील महिलेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मारहाण भोवली! अजित पवारांचे राजीनाम्याचे आदेश, कोण आहे सुरज चव्हाण?

SCROLL FOR NEXT