पुणे

बॅरिकेड्स हटवून मगरपट्टा चौक खुला वळणे बंद करूनही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत नसल्याने कार्यवाही

CD

हडपसर, ता. १७ : मगरपट्टा चौकातील वळणे बंद करूनही वाहतुकीचा प्रश्न सुटत नसल्याने तसेच, स्थानिक नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन अखेर आज (ता. १७) वाहतूक पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स हटवून चौक खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘सकाळ’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी शहरात सुमारे ७५ ठिकाणी चौकातील वाहतुकीला पुढे नेऊन वळण देण्याचा प्रयोग राबविला आहे. या प्रयोगाने वाहतुकीला गती येऊन, ती वाहती राहील याची दक्षता घेतली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या बदलामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मगरपट्टा चौकातील पुलावर दररोज सकाळी संध्याकाळी वाहतूक कोंडी होत होती. याशिवाय पुलाखालील चौकातील वळणे बंद केल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांना एक दीड किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे धोकादायक झाले होते.
हा चौक खुला करावा, अशी मागणी सुरवातीपासून स्थानिक रहिवासी, पादचारी व प्रवाशांनी केली होती. राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक व प्रवाशांनीही वाहतूक पोलिस व महापालिकेला चौक खुला करण्याबाबतचे निवेदन दिले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी त्यासाठी आंदोलनही केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील व उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पाहणी करून उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, वाहतूक पोलिस चौकीच्या अलीकडे दुभाजक तोडून वाहतुकीला वळण देण्याचे कामही करण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर आज सकाळी चौकातील बॅरिकेड्स काढून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

‘‘स्थानिक रहिवासी व प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन, चौक खुला करण्यासाठी आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर ते मागे घेतले. मात्र, चौक खुला न केल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची व नागरिकांच्या त्रासाची दखल घेऊन आज चौक खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उल्हास तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख

‘‘आयुक्त व उपायुक्तांनी काही दिवसांपूर्वी येथील वाहतूक प्रश्नाचा आढावा घेतला होता. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या आदेशानुसार चौकातील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत.''
राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा
......................................

फोटोः 71284

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT