पुणे, ता. २० ः हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील, लाखो लोकांच्या हृदयात घर केलेल्या आणि ‘साधना कट’साठी प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री साधना यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गीतांजली एंटरटेनमेंटस’तर्फे ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या सहकार्याने बालगंधर्व रंगमंदिरात ‘साधना.. मिस्टरी गर्ल’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका गीतांजली जेधे, हिम्मतकुमार पंड्या आणि सीमा येवलेकर यांनी साधना यांच्या चित्रपटांमधील अजरामर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. ज्येष्ठ वादक कलाकार विवेक परांजपे, गोविंद कुडाळकर, हर्षद गणबोटे, प्रवीण जाधव, हार्दिक रावल, अमन सय्यद, राहुल कुलकर्णी, प्रवीण जोशी आणि ज्येष्ठ अकॉर्डियन वादक अनिल गोडे यांनी उत्तम संगीत साथ दिली.
कार्यक्रमासाठीची ध्वनी व्यवस्था अमोल कोळेकर यांनी सांभाळली, तर विजय चेन्नूर यांनी प्रकाश व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. अॅड. अनुराधा भारती यांनी सूत्रसंचालन केले. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, निवृत्त पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश अगरवाल आणि समीर धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. शहरात मुसळधार पाऊस असतानाही अनेकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
--------
फोटो: ‘साधना.. मिस्टरी गर्ल’ कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार
-------
फोटो ः 71443
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.