सिंहगड रस्ता, ता. २० : सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी भागात पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत सात कुटुंबांचे स्थलांतर केले आहेत. या भागात महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे.
एकता नगरी परिसरात द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी आले आहे. खडकवासला धरण साखळीतून ३९ हजार १३८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर हे पाणी परिसरात आले आहे. यासोबतच जलपूजन, श्यामसुंदर, शारदा सरोवर, राज अपार्टमेंट, साई सिद्धार्थ या सोसायटीच्या आवारात आणि एकतानगरी परिसरातील रस्त्यावर पाणी आलेले आहे. आतापर्यंत महापालिकेच्यावतीने सात कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. द्वारका सोसायटीतील हे कुटुंब आहेत. त्यातील एक कुटुंब महापालिकेच्यावतीने सोय करण्यात आलेला बॅडमिंटन सभागृहात थांबले आहे, तर उर्वरित सर्व आपापल्या नातेवाइकांकडे गेले आहेत. महापालिकेच्यावतीने आरोग्य आणि आपत्कालीन तसेच अग्निशमन यंत्रणा २४ तास कार्यान्वित केलेली आहे. सैन्य दलाचे जवानदेखील आलेले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी मोटर तसेच बाटल्यांची सोयदेखील केली आहे.
गेल्यावर्षी पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. परिणामी धरणातून सोडलेला पाण्याच्या विसर्गामध्ये आजूबाजूच्या ओढ्यातून आणि इतर नैसर्गिक स्रोतांतून येणारे पाणीदेखील मिसळले गेले. त्यामुळे एकतानगरी, विठ्ठलवाडीपर्यंत पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली. महापालिकेच्यावतीने प्रज्ञा पोतदार, उपअभियंता अजित सुर्वे, मोहिनी चालुक्य, प्रियांका महाले, प्रज्ञा ढमढेरे, शुभम देशमुख, विद्युत अभियंता मनाली मोरे सर्व आरोग्य निरीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आकडे बोलतात
- खडकवासला धरण साखळीतून आतापर्यंत १४.८१ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले आहे
- पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे यंदा खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव अशा चारही धरण साखळीत मिळून २८.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून एकूण पाणीसाठ्याच्या ९८.३२ टक्के साठा धरणात आहे
- गतवर्षी हा साठा २८.३५ टीएमसी होता. म्हणजे एकूण साठ्याच्या ९७.२६ टक्के टीएमसी पाणी होते
यंदा नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात आले आहे. सोबतच त्याच्या कडेला मातीचा बांधदेखील घालण्यात आला आहे. यामुळे नदीचे पाणी आजूबाजूच्या परिसरात कमी पसरले, तसेच वहन क्षमता देखील वाढली.
- प्रज्ञा पोद्दार, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस आणि येणारे पाण्यानुसार विसर्ग कमी अधिक करण्यात आला. यासाठी सुरुवातीपासून नियोजन करण्यात आले.
- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवा, पाटबंधारे उपविभाग
नागरिक म्हणतात...
स्वाती काळे ः यंदा या परिसरात पाणी आले असले तरी नागरिकांच्या घरात शिरले नाही, परंतु या भागात पाणी येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक भिंत बांधून दिल्यास येथील नागरिकांना दिलासा मिळेल.
भानुमती वर्मा ः गेल्या वर्षी पाणी आले, त्यावेळी सर्व यंत्रणा विविध पक्षांचे नेते, मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री येऊन गेले. या भागाचे पुनर्वसन करावे यासाठी नागरिकांनी मागणी केली होती, परंतु पुढे कोणतीही यंत्रणा राबवली गेली नाही. पुन्हा पाणी आल्यानंतरच प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाल्या आहेत.
कार्यान्वित यंत्रणा
महापालिकेच्या वतीने जेट मशिन, रिसायकल मशिन, मड पंप, ग्रॅब मशिन, जेसीबी, मरिन पंप, अग्निशमन यंत्रणांतर्गत दोन गाड्या, पाण्याचे टँकर, रात्रीसाठी हॅलोजन इत्यादी व्यवस्था करण्यात आली
आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.