पुणे

कात्रज उड्डाणपूल २०२६ पर्यंत पूर्ण

CD

कात्रज, ता. १७ : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासोबत केली. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, सलीम शेख, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके आदी उपस्थित होते.
सुळे यांनी कात्रज चौकातील गंभीर वाहतूक कोंडीचा प्रश्न अधोरेखित करत काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महापालिका आणि संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले. चौकात पूर्वी वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले वॉर्डन अचानक हटविण्यात आले. यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठेकेदारामार्फत वॉर्डन पुन्हा नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या.

३९ गुंठे जागेचा अहवाल द्यावा
कात्रज चौकातील भूसंपादन प्रक्रियेदरम्यान गुगळे कुटुंबाच्या ३९ गुंठे जमिनीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेने या प्लॉटसाठी तब्बल २१ कोटी रुपये मोबदला दिला असतानाही, प्रत्यक्षात मिळालेली जागा ही उताऱ्यावर असून त्याचे क्षेत्रफळ पूर्ण नाही, असे निदर्शनास आल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे पालिकेची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी सुळे यांनी पालिका आयुक्तांना आठ दिवसांत संपूर्ण अहवाल मागविला असून, सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त नवलकिशोर राम यांनीदेखील याप्रकरणी तातडीने पावले उचलली जातील, असे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.

काम करण्यासाठी कात्रजच्या छोट्या उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून परवानग्या मिळाल्या की कामाला आणखी गती मिळणार आहे. आमचा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT