पुणे

नवले पुलावर दोन अपघात; चार जखमी

CD

धायरी, ता. ८ : नवले पूल परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी अपघाताच्या दोन घटना घडल्या. साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर सकाळी ‘सेल्फी पॉईंट’जवळ स्कूल बसची मोटारीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात मोटारीतील एक जखमी झाला. तर स्कूल बसमधील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अन्य एका अपघातात मोटार दुभाजकावर आदळल्याने चालक जखमी झाला आहे.
या प्रकरणी विशाल संपतराव पाटील (रा. तळेगाव दाभाडे) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बसचालक जीवन अंबादास शिंदे (रा. मानाजीनगर, नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पूल परिसरात सतत अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे वेग नियंत्रण, रस्त्यांची रचना आणि सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नियंत्रण सुटून दुभाजकावर धडक
नवले पूल परिसरात सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मुंबई -बंगळूर महामार्गावर साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर स्वामिनारायण मंदिरासमोर आणखी एक अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार लोखंडी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात मोटारीचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या दोन्ही अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती; मात्र सिंहगड वाहतूक विभाग आणि सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

SCROLL FOR NEXT