पुणे

सायकल स्पर्धेमुळे उजळले रस्त्यांचे भाग्य

CD

ज्ञानेश्वर वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता. २९ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्त मावळ तालुक्यातील आठ रस्त्यांची आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सुधारणा आणि उच्च दर्जाचे डांबरीकरण झाले आहे. या सुधारित रस्त्यांमुळे मावळ व मुळशीतील पर्यटनस्थळे जोडली गेली आहेत. याचा फायदा पर्यटन क्षेत्रासह रोजच्या वाहतुकीला होणार आहे.

स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’च्या ठेव अंशदान योजनेतून सुमारे ४४ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यातून मावळातील- ३५ आणि हवेली तालुक्यातील सुमारे नऊ किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा व चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे अडीच किलोमीटरचे रस्ते ३.७५ मीटर रुंदीचे होते. ते ५.५० मीटरचे करण्यात आले आहेत. डोणे ते शिवणे, शिवणे ते कडधे तसेच काले ते जवन या रस्त्यांवर सध्या साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. नद्या व ओढ्यांवर संरक्षक जाळ्या व कठडे लावले जात आहेत. एक जानेवारीनंतर थर्मोप्लॅस्टिक पेंटने रस्त्यावर मार्किंगचे सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम वडगाव विभागाचे उप अभियंता धनराज दराडे व सहाय्यक अभियंता पूनम जाधव यांनी दिली.

या मार्गावर होणार स्पर्धा
जवन-ब्राह्मणोली-पवनानगर, काले-कडधे, कडधे-शिवणे, शिवणे-डोणे, डोणे-आढले फाटा, आढले बुद्रुक फाटा ते बेबडओहोळ राइस मिल, बेबडओहोळ राइस मिल ते चांदखेड

वीस गावांना फायदा
पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या रस्त्यांची सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सुधारणा होत आहे. त्यामुळे मावळातील सुमारे वीस गावांना फायदा होणार आहे. कासारसाई, पवना धरण, तिकोना, हडशी ही मावळ व मुळशीतील पर्यटनस्थळे जोडली गेली आहेत.

सायकल स्पर्धेनिमित्त रस्त्यांचा कायापालट झाला आहे. प्रथमच एवढ्या चांगल्या पद्धतीने रस्त्यांची कामे झाली आहेत. अशा स्पर्धा वारंवार व्हाव्यात. यामुळे ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळेल.
- रवींद्र घारे, ग्रामस्थ, बेबडओहळ

पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. सायकल स्पर्धमुळे रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण झाले. शनिवार रविवारी या रस्त्यावरून पर्यटक जातात त्यांनाही उपयोग होईल.
- किशोर साळुंखे, ग्रामस्थ, आढले बुद्रुक

खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वांचे हाल होत होते. पावसाळ्यानंतर तात्पुरती डागडुजी व्हायची. आता पहिल्यांदाच दूरपर्यंत चांगला रस्ता केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
- बाळासाहेब वाळुंज, ग्रामस्थ, शिवणे

PNE25V80510

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT