पुणे

अध्यात्म, प्रबोधनाच्या परंपरेचा शताब्दी सोहळा

CD

वडगाव मावळ, ता. ९ : गावोगावच्या जत्रांमध्ये गेल्या शंभर वर्षांपासून भजनी भारुडांचा कार्यक्रम करणाऱ्या मावळ तालुक्यातील पवळेवाडीच्या श्रीराम कला पथकाचा शताब्दी सोहळा सोमवारी (ता.११) साजरा होत आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. ही माहिती कला पथकाचे अध्यक्ष गोपाळ पवळे व उपाध्यक्ष हरिभाऊ पवळे यांनी दिली.
पवळेवाडी गावाने पिढ्यान्‌पिढ्या भजनी भारुडाची कला जोपासली आहे. गावातील प्रत्येक घरातून एका तरी व्यक्तीने यात काम केले आहे. या श्रीराम कला पथक मंडळाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात पहाटे काकड आरती, दुपारी तीन ते पाच मिरवणूक, सायंकाळी पाच ते सात जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन, सायंकाळी मान्यवर व भारुड कलाकारांचा सत्कार सोहळा होणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, राज्य तमाशा मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत.

पूर्वी अनेक गावांमध्ये भजनी भारूड पथके होती. परंतु, सध्या काही मोजक्या गावांमध्येच ही पथके आहेत. त्यात प्रामुख्याने पवळेवाडी, ओझर्डे, सडवली, कल्हाट, कोंडिवडे, भोयरे, आढे येथील पथकांचाही समावेश आहे.

पवळेवाडीत जवळपास प्रत्येक कुटुंबात वादक, गायक, भारूड कलाकार तयार झाले आहेत. दौंड येथील दादाभाऊ सय्यद हे सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपासून या पथकासाठी वगनाट्य लिखाण व विविध भूमिका साकारतात. पथकातील पुरुषच स्त्रीची भूमिका साकारतात. भारुडाची सुरुवात संतांच्या अभंगाने होते. गणेशस्तवन, गणगवळण, बतावणी, रंगबाजी व त्यानंतर वगनाट्याने समाप्ती होते. रामराज्य, जेजुरीचा मल्हारी खंडेराया, सत्त्वशील राजा हरिश्चंद्र, संत ज्ञानेश्वर माझी माउली, कान्होपात्रा, संत तुकाराम महाराज ही या पथकाची गाजलेली वगनाट्ये आहेत. यासोबतच शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूणहत्या असे सामाजिक विषयही हाताळले जातात.

पथकातील कलाकार व्यवसाय म्हणून नव्हे, तर पिढीपरंपरेनुसार चालत आलेली भारुडाच्या कलेची परंपरा पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने काम करतात. यापुढील काळातही ही परंपरा अशीच सुरू राहील.
- गोपाळ पवळे, अध्यक्ष, श्रीराम कला पथक, पवळेवाडी

आमच्या तीन पिढ्या आवडीने भारुडात काम करत आहेत. मी गेल्या ६० वर्षांपासून या कलेत कार्यरत आहे. पूर्वी २० रुपये बिदागी (सुपारी) मिळायची. आता ती ६० ते ७० हजार रुपयांवर गेली आहे.
- ज्ञानेश्वर कराळे, भारुड कलाकार, पवळेवाडी

PNE26W17966

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

SCROLL FOR NEXT