पुणे

वैराग : शारदादेवी प्रशालेचा शंभर टक्के निकाल

CD

शारदादेवी प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के
वैराग, ता. ९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत कै. उद्धवरावजी पाटील क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित शारदादेवी प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. प्रशालेत श्रुती सचिन पानबुडे हिने ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अनुजा नितीन पानबुडे हिने ९१.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर भारतीय संग्राम शिखरे (८५.६० टक्के) व शिवेंद्र सयाजीराव निंबाळकर (८५.२० टक्के) यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळविला.
--------------
अर्णव माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
वैराग, ता. ९ : सासुरे फाटा, वैराग (ता. बार्शी) येथील अर्णव माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातील आयुष अमोल भोसले याने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रणव महादेव आवारे याने ९१.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर शिवम कल्याण पाटील याने ८९.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
------
शिवप्रभा माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्केची परंपरा
वैराग, ता. ९ : नागोबा चौक, रुई येथील शिवप्रभा माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील श्रावणी राहुल मोहिते हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. प्रगती संतोष पावले हिने ९४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तर करण साईनाथ पांडगळे, कार्तिकी किशोर खडके व समीक्षा महादेव शेळके यांनी प्रत्येकी ९०.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

RR vs GT Live : यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार! रियान पराग संघाबाहेर का? व्हॅपिंग प्रकरण भोवले की आणखी काही?

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT