पुणे

वाई:-वाई फेस्टीव्हल २०२५ अंतर्गत शहीद जवानांच्या स्मरणार्थ सायकल रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद.

CD

वाईत सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

वाई, ता. १५ : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था व वाई जिमखाना यांच्या वतीने आयोजित ‘वाई फेस्टिव्हल २०२५’ अंतर्गत शहीद जवानांच्या स्मरणार्थ भव्य सायकल रॅली शहरात उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात झाली.
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना मानवंदना देणे, तसेच युवकांमध्ये देशप्रेम, शिस्त, आरोग्य व सामाजिक जाणीव निर्माण करणे या उदात्त उद्देशाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहर व परिसरातील युवकांनी व नागरिकांनी प्रतिसाद देऊन ६९९ सायकलस्वारांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती समितीचे सदस्य रणवीर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगून युवकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन केले.
या वेळी सायकलस्वार हेमंत ढवळे, अमोल साळवी, श्रावणी साळवी व सर्जेराव बडे यांची विशेष उपस्थिती होती. विविध वयोगटातील सायकलस्वारांनी सहभागी होत देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून टाकला. या प्रसंगी फेस्टिव्हलचे अध्यक्ष संजय वाईकर, कोषाध्यक्ष ॲड. रमेश यादव, निमंत्रक अमर कोल्हापुरे, प्रीती कोल्हापुरे, वैभव फुले, भूषण तारू, डॉ. मंगला अहिवळे, अमीर बागूल आदी मान्यवर उपस्थित होते.
-----
07352
वाई ः शहीद जवानांच्या स्मरणार्थ सायकल रॅलीत सहभागी विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari announcement: नितीन गडकरींकडून महाराष्ट्र-कर्नाटकशी निगडीत मोठ्या प्रकल्पास मंजुरी!, आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार

Jalgaon News : जळगावात आमदारकीची जागा ३ वर्षांपासून रिक्त; जिल्हा परिषद निवडणुकांमुळे विधान परिषदेचा पेच कायम!

MPSC Exam Result : शेतकऱ्याच्या मुलीची उपविभागीय कृषी अधिकारीपदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध, अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग; कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT