पुणे

वाई-लोकसहभागाने गावे होतील पर्यावरण समृद्ध:नितीन पाटील

CD

लोकसहभागातून गावे होतील समृद्ध

नितीन पाटील; स्वयंसहाय्यता बचत गटांच्या बोपर्डी फेस्टिव्हलचे उद्‌घाटन

वाई शहर, ता. २८ : ग्रामपंचायत नेतृत्व तळातून आल्यामुळे ते गावागावांचे रूप पालटू शकतात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग वाढल्यास गावे पर्यावरण समृद्ध होतील, असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत बोपर्डी (ता. वाई) येथे आयोजित स्वयंसहाय्यता बचत गटांच्या बोपर्डी फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. शंकरराव गाढवे, दीपक बाबर, मनीषा गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी सचिन पाटील, प्रल्हाद गाढवे, जिल्हा सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, सचिव शत्रुघ्न धनवडे, चंद्रकांत सणस, बबन भिलारे आदी उपस्थित होते.

अभियानाच्या यशस्वितेसाठी पंचायत समितीने गावोगावी बैठका घेऊन गावकऱ्यांना प्रेरित करावे. सरपंच परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा राज्यातील स्ट्रीट लाइटच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला असून, पुढील काळात गावपातळीवर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी बोपर्डी जिल्ह्यात अव्वल ठरण्याच्या क्षमतेचे असल्याचे सांगून सरपंच व सदस्य, ग्रामस्थांनी राज्यातील आदर्श गावांची प्रगती नजरेसमोर ठेवून काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात तालुका सरपंच परिषदेच्या नूतन कार्यकारिणीतील राजाबापू गाढवे, प्रसाद गुरव, सर्जेराव पवार, सुनील फणसे, निखिल राजपुरे, नीलम शिवथरे, सुनील ढवळे, स्वप्नाली मोहोळकर, प्रदीप गोळे यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. उपसरपंच ऋषिकेश गाढवे, आनंदा गुरव, दीपाली घाटे, सुनील गाढवे, भारती पवार, गिरीश गाढवे यांनी स्वागत केले. रणजित गाढवे यांनी आभार मानले.
------
07396
बोपर्डी : फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना नितीन पाटील. त्या वेळी विजयकुमार परीट, शंकरराव गाढवे, मनीषा गाढवे, डॉ. सचिन पाटील, प्रल्हाद गाढवे आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Municipal Elections 2025 : अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक; जागावाटपावरून युती-आघाडीत वाद; बैठकांवर बैठका, पण तोडगा निघेना, घोडं अडलंय कुठं?

Navneet Rana यांचा Thackeray वर घणाघात, 'उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला' | Sakal News

Akola Municipal Election 2025 : ठरलं! अकोल्यात शरद पवार गट अन् काँग्रेसची युती; ठाकरे गटाची भूमिका अजूनही गुलदस्त्यात

Vijayanagara Empire Heritage Site : विजयनगरचे वैभव आणि किष्किंधेचा इतिहास; सोलो ट्रिपमधून उलगडलेले हंपीचे सौंदर्य

SCROLL FOR NEXT