पुणे

वाई:-व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ''अंतरंग समृद्धीसाठी मनाचे श्लोक'' या संकल्पनेला अनुसरून संपन्न.

CD

वाईत ‘अंतरंग समृद्धीसाठी मनाचे श्लोक’

व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संकल्पना

वाई, ता. २९ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात झाले. ‘अंतरंग समृद्धीसाठी मनाचे श्लोक’ ही या स्नेहसंमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती.
यामध्ये प्री-प्रायमरीपासून ते इयत्ता दहावीपर्यंतच्या जवळपास ६५० विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमात संत रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक यांतील निवडक श्लोकांचा आशय केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी नाटिका, समूहगायन, एकल गीत, भावनृत्य आणि समूह नृत्य सादर केली.
प्रत्येक सादरीकरणातून मनःशुद्धी, आत्मसंयम, सकारात्मक विचार, चारित्र्यनिर्मिती आणि अंतर्मनाच्या समृद्धीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून केवळ कलागुणांचे दर्शन घडले नाही, तर भारतीय संस्कृतीतील मूल्यांची जाण आणि भावनिक बुद्धिमत्तेचे दर्शन घडले. त्यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाई अर्बन बँकेचे संचालक विवेक पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. मनाचे श्लोक ही केवळ साहित्यकृती नसून जीवन जगण्याची दिशा देणारे तत्त्वज्ञान आहे असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्नेहसंमेलनासाठी वाई प्रकल्पाचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर सोनपाटकी, शाला समिती सदस्य अविनाश जोशी, सुनील शिंदे, रमेश कोरडे, श्रीराम भट, अंजली काणे, मुग्धा वैद्य, डॉ. स्वाती देशपांडे उपस्थित होते. मुख्याध्यापक विद्या राव यांनी आयोजन केले. सविता सलागरे आणि अपर्णा सपकाळ यांचे सहकार्य लाभले. कार्याध्यक्षा माधवी जाधव आणि जयश्री कुंभार या होत्या.
--------------------------------
07408
वाई : व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी सादर केलेली कलाकृती.
--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT