पुणे

वाई:-श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास जीवन यशस्वी:-दशरथ शिरसाठ गर्जा महाराष्ट्र माझा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वाईत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला प्रतिसाद

सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार वितरण; दशरथ शिरसाठ यांचे मार्गदर्शन

वाई, ता. ८ : श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास जीवन यशस्वी होते, असे मत विचारवंत व प्रबोधनकार दशरथ शिरसाठ (मुंबई) यांनी ‘गाथा महाराष्ट्राची’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी राज्यभाषा दिनाच्या औचित्याने सर्वोदय सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सुगम संध्या आणि प्रबोधनात्मक व्याख्यान यांच्या संगमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. नगराध्यक्ष अनिल सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, आनंद चिरगुटे, नगरसेवक भारत खामकर, विजय ढेकाणे, काशिनाथ शेलार, लक्ष्मी कळंबे, जीवन विद्या मिशनच्या अध्यक्षा स्वाती मांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ‘सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार’ कृष्णा नदी सेवा कार्य फाउंडेशन, तसेच नगरपालिकेतील आदर्श सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. उपाध्यक्ष प्रकाश वाडकार यांनी प्रस्ताविक केले. संतोष वाडकर व वैशाली वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंद गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे, सचिव संतोष वाडकर, खजिनदार ज्ञानदेव वाशिवले तसेच सर्व संचालक व सभासद यांनी परिश्रम घेतले.
-------------------------
07856
वाई : सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी अनिल सावंत, संजय जेधे, बापूसाहेब शिंदे, काशिनाथ शेलार आदी.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT