पुणे

विंग. कोळेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बालबचत बँकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

CD

कोळेवाडीत बालबचत बॅंकेत लाखाची उलाढाल

प्राथमिक शाळेत उपक्रम; विद्यार्थी होताहेत आर्थिक साक्षर, नावीन्यपूर्ण उपक्रम

विंग, ता. २९ ः विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी जिल्हा परिषदेच्या कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळेने सुरू केलेल्या शालेय बालबचत बँकेने अवघ्या काही काळातच एक लाख रुपयाहून अधिक अर्थिक उलाढाल केली आहे. खाऊला दिलेले पैसे विद्यार्थिनी बचत बँकेत जमा केले असून, सुमारे ६० हजार रुपयांची शिल्लक आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही कौतुक केले आहे.
विविध उपक्रमामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कोळेवाडी शाळेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्राचा अनुभव मिळावा, या उद्देशाने बालबचत बँकेचा अभिनव उपक्रम राबवला आहे. शाळेमध्येच उपक्रम साकारला आहे. पासबुक, कीर्द, खतावणी, पैसे भरणे- काढणे यांसह संपूर्ण बँकेचे मॉडेल उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बँक व्यवहार विद्यार्थीच सांभाळत आहेत. बँक कशी चालते, याचा अनुभव विद्यार्थी घेताहेत.
यासाठी दर दोन महिन्यांनी बँकेतील विद्यार्थी कर्मचारी बदलले जातात. एक जुना व दोन नवे अशा पद्धतीने कर्मचारी नेमणूक केली असून, व्यवहार सुरू ठेवले जातात. विद्यार्थ्यांना चेक लिहिणे, पैसे जमा-काढणे, खातेवही सांभाळणे याचे प्रत्यक्ष ज्ञान त्यामुळे मिळत आहेत. बचतीची सवयही लागली आहे. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आपल्या खात्यातील पैसे वापरत आहेत. त्यामुळे लहान वयातच आर्थिक नियोजन आणि जबाबदारीची जाणीव त्यांच्यात निर्माण होत आहे.
सध्या बाल बचत बँकेत १९६ खाती आहेत. त्यामध्ये किमान ५० रुपये ते कमाल ४,७०० रुपये इतकी रक्कम एकेकाच्या नावे जमा आहे. मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस बँकेचे व्यवहार चालवतात. दुपारी दीड ते सव्वादोन वेळ निश्चित केली आहे. पाच- दहा रुपयांच्या बचतीतून लाखाहून अधिक उलाढाल करणारी जिल्ह्यातील ही एकमेव शालेय बाल बचत बँक ठरली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका भारती लोकरे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंसेवक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुलांना मार्गदर्शन करत आहेत. सर्वसामान्यापासून डॉक्टर, इंजिनियर व उच्च सदस्य पदस्थ अधिकारी ते पोलिस कर्मचाऱ्यांची मुले या शाळेत शिक्षण घेताहेत. कोळेवाडीसह शिंदेवाडी, मलकापूर, कोळे, कुसुर, तारूख, बामणवाडी, चाळकेवाडी, पवारवाडी, सुपने, विंग आदी गावांतून प्रवास करून विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे ये-जा करतात. २७१ विद्यार्थी पटसंख्या असून, त्यापैकी सत्तरहून अधिक विद्यार्थी परगावाहून तेथे येतात.

--------------------------------

क्रीडा, स्वसंरक्षणाचे धडे
शिक्षणासोबत क्रीडा व स्वसंरक्षणाचे धडे या शाळेत दिले जातात. त्यामध्ये लाठीकाठी, कराटे, कुस्ती, धनुर्विद्या, तलवारबाजी थाळीफेक, खो- खो, कबड्डी आदी क्रीडा प्रकारांत तालुका जिल्हा विभागीय, तसेच राज्य पातळीवर तिथली मुले चमकली आहेत. शाळेच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद असून, त्याचे गावकऱ्यांतून कौतुक होत आहे.

--------------------------

02107
कोळेवाडी : जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेने राबवलेल्या बाल बचत बँकेत आर्थिक साक्षरतेचा अनुभव घेताना विद्यार्थी. (छायाचित्र ः संदीप कोरडे)

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT