पुणे

उन्हाळ्यामुळे रसदार फळांना मागणी

CD

मार्केट यार्ड, ता. २६ : उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढत असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अनेकजण मोठ्या प्रमाणात फळे किंवा फळांचा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. कलिंगड, खरबूज, अननस, आंबे मोसंबी, डाळिंब, काळे आणि हिरवे द्राक्षे या मधूर चव असणाऱ्या फळांना मागणी आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ही फळे उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज भरून काढण्यास मदत करतात.
रमजान महिना सुरू झाल्याने इफ्तारसाठी बाजारात कलिंगड, खरबूज, अननस, पपईच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या फळांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेने ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर आवक वाढल्याने डाळिंबाच्या भावात १० टक्क्यांनी घट झाली आहे.
बाजारात पुणे उपनगरे, यासह लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पिंपरी चिंचवड तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथून मोठ्या प्रमाणात रसदार फळांना मागणी असते. फ्रुट सलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी फळांना मोठी मागणी असते. तसेच घरी खाण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात नागरिक याची खरेदी करतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात दिवसेंदिवस अवाक वाढत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

येथून होते आवक
- कलिंगड, खरबूज : श्रीगोंदा, दौंड, सोलापूर, सातारा, कराड, शिरूर, कर्जत, राशन, कर्नाटक : ८०-९० टन
- मोसंबी : औरंगाबाद, नगर, सोलापूर : ३५-४० टन
- संत्री : अमरावती, नागपूर : ५०-६० टन
- अननस : केरळ - ६ ट्रक
- डाळिंब : पुणे, सोलापूर, नाशिक, नगर : २० - २० टन
- द्राक्षे : बारामती, सांगली, सोलापूर :
- आंबा : कोकण, कर्नाटक, केरळ : ७-८ हजार पेटी

ऊन वाढेल तसे ग्राहकांची संख्या देखील वाढत आहे. उन्हाचा कडका असल्याने मागणी वाढत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने १० ते १५ टक्के भाव जास्त आहेत. पुढील काही दिवसात अजून अवाक वाढणार आहे.
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड

घाऊक बाजारातील दर
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : मोसंबी : (३ डझन) : २२०-४००, ( ४ डझन) : १००-२२०, संत्री : (१०किलो) : ३००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१८०, गणेश : १०-५०, आरक्ता ३०-६०, कलिंगड : ८-१४, खरबूज : २२-२५, पपई : १२-३०, अननस (एक डझन) : १०० ते ६००, पेरू (वीस किलो ) : १०००-१२००, चिक्कू (दहा किलो ) : २००-५००. आंबा - रत्नागिरी हापूस कच्चा ४ ते ७ डझन - २००० ते ३५०० रुपये, ५ ते ९ डझन २५०० ते ४५०० रुपये.

किरकोळ बाजारातील दर्जानुसार प्रती किलोचा दर
कलिंगड - २०-३० रुपये
खरबूज - ३०-४० रुपये
पपई - २०-४० रुपये
मोसंबी - ८०-१०० रुपये
संत्री - ८०-१२० रुपये
अननस - ६०-१०० रुपये (एक अननस)
डाळिंब - ८०-१०० रुपये
द्राक्षे - ४०-८० रुपये
हापूस आंबा - ८००-१२०० रुपये (डझन)
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT