मार्केट यार्ड, ता. ३ : उन्हामुळे गणेशपेठ मासळी बाजारात सर्व प्रकारच्या मासळीची आवक कमी होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे मासळीच्या भावातील तेजी कायम आहे. चिकनच्या भावात किलोमागे १० रुपयांनी घट झाली आहे. इंग्लिश अंड्यांच्या मागणीत घट झाल्याने भावात शेकड्यामागे ५० रुपयांनी घसरण झाली. परिणामी किरकोळ विक्रीतही इंग्लिश अंड्यांच्या भावात ५० पैसे घट झाली आहे. मागणी इतकाच पुरवठा होत असल्याने गावरान अंडी व मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची १५ टन, खाडीच्या मासळीची ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ८०० टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची २५ टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)- पापलेट : कापरी : १६००, मोठे : १६००, मध्यम : १२००-१४००, लहान : १०००, भिला : ९००-९५०, हलवा : ६५०-७५०, लहान सुरमई : ८००-१००, मोठी सुरमई : १०००-११००, रावस : ६५०-७५०, घोळ : ७००-८००, करली : ३२०-४००, करंदी (सोललेली) : ५००-५५०, भिंग : २००-३००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी : ९००-१०००, काळी : ३६०-४००, ओले बोंबील : ३२०-३६०. कोळंबी : लहान : २४०-३६०, मोठी : ४००-६५०, जम्बो प्रॉन्स : १६००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : २४०-३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २८०-३६०, चिंबोऱ्या : ८००-९००. खाडीची मासळी : सौंदाळे : ३२०, खापी : ३२०, नगली : ६५०-७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०-३२०, लेपा : २४०, बांगडा : लहान : २००, मोठा : २४०-२८०, शेवटे : २४०-२८०, पेडवी : १२०-१४०, बेळुंजी : १४०-१६०, खुबे : १२०-१४०, तिसऱ्या : १८०-२००, तारली : १४०-१६०. आंध्र प्रदेश रहू : १६०-१८०, आंध्र प्रदेश कतला : १६०-१८०, नदीतील मासळी : रहू : २००-२४०, कतला : २००-२४०, मरळ : ३६०-४००, शिवडा : १६०-२००, खवली : २००, आम्ळी : १४०-१६०, खेकडे : ३००-३५०, चिलापी : ६०-१६०, वाम : ५००-५५०.
मटण : बोकड : ७४०, बोलाई : ७४०, खिमा : ७४०, कलेजी : ७८०.
चिकन : २३०, लेगपीस : २८०, जिवंत कोंबडी : १६०, बोनलेस : ३३०.
अंडी : गावरान (शेकडा) : ९९०, डझन : १३०, प्रतिनग : ११.
इंग्लिश (शेकडा) : ५३०, डझन : ७२, प्रतिनग : ६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.