food sakal
पुणे

तुरीचा दर पावणेदोनशेच्या दिशेने; मूग, उडीदच्या भावानेही ओलांडली शंभरी

धान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे आठ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तूर डाळीचा एका किलोचा भाव १५५ ते १६८ रुपयांपर्यंत गेला आहे.

प्रवीण डोके

मार्केट यार्ड : धान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे आठ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तूर डाळीचा एका किलोचा भाव १५५ ते १६८ रुपयांपर्यंत गेला आहे. मूग आणि उडीद या डाळींच्या भावानेही शंभरी ओलांडली आहे. डाळींचे दर इतके वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसत आहे.

घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. भुसार बाजारात डाळी आणि कडधान्याची दररोज सुमारे १५० ते २०० टन इतकी आवक होत आहे. सध्या खानावळ, हॉटेल असे व्यवसाय करणाऱ्यांकडून मागणी आहेच. हॉटेलातील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय विविध कौटुंबिक तसेच व्यावसायिक समारंभांचेही आयोजन होत आहे. त्यामुळेही डाळींना मागणी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर दर वाढले आहेत. या परिणाम म्हणून बेसन आणि भाजके डाळे यांचे दरही आणखी वाढल्याचे दिसते. गेली दोन वर्षे कडधान्याचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे डाळींचे भाव नियंत्रणात आले होते.

परंतु यावर्षी डाळींच्या उत्पादन क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे. परिणामी आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये डाळींचे दर वाढू लागले आहेत.

या घडामोडींचाही परिणाम

- मागील वर्षी पाऊस कमी
- पेरण्या कमी झाल्याने उत्पादनात घट
- मागणीच्या तुलनेत आवक कमी
- आयात मालाची कमतरता

येथून येतात डाळी

मार्केट यार्डात हरभरा डाळ महाराष्ट्रातील लातूर, अकोला या भागांतून येते. तूर डाळ विदर्भातील अकोला, वाशिमसह मराठवाड्यातील लातूर, उदगीर, बार्शी तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून बाजारात विक्रीला येते.

मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने डाळींचे पेरणी क्षेत्र कमी झाले. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात डाळींचे उत्पादन घटले. बाजारात प्रामुख्याने तूर डाळीला जास्त मागणी असल्याने या डाळीच्या दरात जास्त प्रमाणात वाढ झाली आहे.
- नितीन नहार, धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड

किलोचे भाव


प्रकार -- मार्च २०२४ -- एप्रिल २०२४
तूर - १३८ ते १४६ -- १५५ ते १६८
मूग - १०६ ते १०९ -- १११ ते ११५
मसूर - ७२ ते ७५ -- ७६ ते ८०
हरभरा - ६८ ते ७२ -- ७५ ते ८०
उडीद - १११ ते १२० -- १२२ ते १३८
हिरवा वाटाणा - ७२ ते ७५ -- ९० ते ९८
बेसन - ८९ ते ९३ -- ९२ ते ९६
भाजके डाळे - ८५ ते ८९ -- ८८ ते ९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT