पुणे

जादा जागेची शुल्क आकारणी बंद करा

CD

मार्केट यार्ड, ता. १० : पुणे बाजार समितीच्या फूल बाजारात शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी वापरलेल्या जागेसाठी जादा शुल्क आकारले जात आहे. दुसरीकडे त्याच बाजारातील भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळे विभागात अडत्यांनी शेतीमाल ठेवण्यासाठी अधिकची जागा वापरल्यास त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे एकाच बाजारात दोन विभागांतील व्यापाऱ्यांना वेगवेगळे नियम असल्याने पुणे बाजार समितीचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

बाजारात शेतकऱ्यांनी आणलेली फुले विकण्यासाठी अनेक अडते समितीने ठरवून दिलेल्या जागेत फुले ठेवून त्याची विक्री करतात. त्यासाठी समिती जादा जागेचे शुल्क आकारत आहे. त्यामुळे फूलबाजारात अडत्यांवर अन्याय होत असून, हे जादा शुल्क रद्द करावे, अशी मागणी अखिल पुणे फूलबाजार अडते संघटनेने पत्राद्वारे बाजार समिती प्रशासनाकडे केली आहे. सण, उत्सव काळात फूल बाजारात विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. अधिकची आवक झाल्यास फुले ठेवण्यासाठी जागा अपुरी पडते. अशा वेळी अडते बाजार समितीने ठरवून दिलेल्या जागेत फुले ठेवून त्याची विक्री करत असतात.
त्यासाठी बाजार समिती त्यांच्याकडून त्या जागेचे भाडे आकारत असते. पूर्वी या जागेसाठी प्रशासनाकडून कोणतेही शुल्क आकारला जात नव्हता. मात्र, प्रशासक काळापासून भाडे आकारले जात आहे. प्रारंभीच्या काळात ३० रुपये शुल्कापासून सुरुवात झाली होती. मात्र, आता त्यातही वाढ झाल्याने त्याचा बोजा अडत्यावर पडत असल्याचे पत्रात म्हटले आहे. मधल्या काळात भाडे न भरणाऱ्या अडत्यांना नव्याने नोटिसा काढल्या असून, भाडे भरण्यास सांगण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने जादा जागा आकारणी शुल्क रद्द करण्यासाठीचे पत्र बाजार समितीला दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अरुण वीर, उपाध्यक्ष एस. एस. चौधरी, सचिव प्रकाश काळे, समन्वयक सागर भोसले यांनी दिली.


फूल बाजारातील अडत्यांकडूनही जागेचे शुल्क आकारू नये. विशेष म्हणजे फुलांची अधिकची आवक झाल्यास अडते बाजार समितीकडे त्याचा सेस भरत असतात. जागेच्या भाड्यापेक्षा अडत्यांनी भरलेला सेस अधिक असतो. त्यामुळे इतर विभागाप्रमाणे फूल बाजारातही अधिकच्या जागेचे शुल्क आकारले जाऊ नये.
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार अडते असोसिएशन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT