पुणे

बाजार शुल्कावरून व्यापारी आक्रमक

CD

मार्केट यार्ड, ता. १७ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजार शुल्क कमी करण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला. हा निर्णय मागे घेऊन शासनाने व्यापारी तसेच जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा रविवारी (ता. २०) दि पूना मर्चंट्स चेंबरमध्ये सकाळी ११ वाजता मेळावा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितीच्या बैठकीत पणन विभागाला व्यापारी तसेच शेतकरी प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची समिती करून एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु सतत पाठपुरावा करून देखील याबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांची भूमिका काय असली पाहिजे यावर विचार करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला असल्याचे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी सांगितले.

पारंपारिक व्यापाराला फटका
२०१७ मध्ये जीएसटी लावताना ‘एक देश, एक कर’ अशी घोषणा सरकारने केली होती. असे असतानाही अजूनही बाजार समिती शुल्क का आकारत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे बाजार समित्यांमधील पारंपारिक व्यापार कमी झाला आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च आस्थापना व पगारासाठी खर्च होत आहे. बाजार समित्यांमधुन एकाच वस्तूवर पुन्हा पुन्हा बाजार शुल्क आकारल्याने वस्तू महाग होत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील तरतुदीमुळे पारंपारिक व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बाजार समिती कायद्यानंतर अस्तित्वात आलेल्या पॅकिंग अ‍ॅक्ट, एफएसएआय अ‍ॅक्ट, वजन मापे कायदा इत्यादी तरतुदींमुळे बाजार आवारात पॅक बंद वस्तू विक्री करणे कायद्याने बंधनकारक झाले आहे. तयार मालावर फी आकारणे चुकीचे आहे. परराज्यातून आयात होणाऱ्या मालावरही बाजार समितीकडून शुल्क आकारणी होत आहे. या मुद्यांवर मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. तसेच बाजार शुल्क रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन कृती समितीच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठीया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी कारवाई! पोलिसांनी पाच आरोपींना दौंडमधून घेतलं ताब्यात

Mumbai Indians चा कॅप्टन कोण, रोहित शर्मा की दुसरं कोणी? त्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

Pune: कोयत्याचा शोध कोणी लावला? शेतकऱ्याच्या अवजाराला गुन्हेगारी शस्त्राचा रंग कसा लागला?

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

Latest Marathi News Live Update: मुंबई राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यावर अखेर पडदा; माजी कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT