मार्केट यार्ड, ता. १७ : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. परिणामी सर्वच प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. रविवारी (ता. १७) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटकातून पावटा २ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, इंदौर येथून ६ ते ७ टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात येथून ३ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ५ ते ६ टेम्पो इतकी आवक झाली होती.
तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो दहा ते अकरा हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंगा ४०-५० गोणी, मटार पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा नवीन : २५०-४०० जुना : ५००-६००, बटाटा : २५०- ४००, लसूण : २३००- ३७००, आले सातारी: ४५०-१०००, भेंडी : ३५०-४००, गवार : ६५०- ७००, टोमॅटो : १६०-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : १४०-१६०, दुधी भोपळा : १६०-१८०, चवळी : ३००-३५०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : २५०-३००, पापडी : ४५०-५५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर :२००-२५०, कोबी : २००- २२०, वांगी : ४००-५००, डिंगरी : ३००-४००, नवलकोल : ३००-३५०, ढोबळी मिरची : ३५०-४५०, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १५०-२००, शेवगा : १५००-१७००, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-३५०, बीट : २८०-३२०, घेवडा : २५०-३००, कोहळा : २००- २५०, आर्वी : २००-२५०, घोसाळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंगा : ७००-७५०, मटार : स्थानिक : ७००-९००, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : २००-२५०, सुरण : ३००-३५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
कोथिंबिरीच्या भावात घट
मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीच्या भावात घट तर मेथीच्या भावात वाढ झाली असून कांदापात, पुदीना, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका आणि चवळईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (ता. १७) कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख जुडी तर मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : २०००-२३००, शेपू : ८००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००- ७००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-७००, मुळा : ८००-१५००, राजगिरा : ५००- ८००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१५००.
कलिंगड, खरबुजाच्या भावात वाढ
कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात वाढ झाली असून डाळिंबाच्या भावात घट झाली आहे. सीताफळ, चिक्कू, अननस, सफरचंद, बोरे, संत्री, मोसंबी आणि लिंबाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (ता. १७) मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब ६० ते ६५ टन, पपई ३ ते ४ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिक्कू एक हजार गोणी, पेरू १ हजार ते बाराशे क्रेट, अननस ६ ट्रक, सीताफळ ३० ते ३५ टन, बोरांची २५० गोणी, सफरचंद दोन ते अडीच हजार पेटी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबू (प्रतिगोणी) : २००-७००, मोसंबी : (३ डझन) : २२०-४००, (४ डझन) : १२०-२५०, संत्री : (१०
किलो) : १५०-५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, आरक्ता : १०-५०, गणेश : १०-३०, कलिंगड : १२-२५, खरबूज : ३०-५०, पपई : ८-३०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ १० -७०, अननस (१ डझन) : १००-६००, सफरचंद काश्मीर डेलिशियस (१५ ते १६ किलो): १३००-१९००, किन्नोर : (२० ते २५ किलो) ३२०० ते ४०००, बोरे (१० किलो) चमेली : २८०- ३००, उमराण : ८०-१००, चेकनट : ८००-९००, चण्यामण्या: ६००-८००.
लग्नसराईमुळे शोभीवंत फुलांना मागणी
मार्केट यार्डातील फूलबाजारात रविवारी (ता. १७) लग्नसराईमुळे शोभीवंत फुलांना मागणी वाढली आहे. परिणामी भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुट्या फुलांना देखील मागणी चांगली आहे. मात्र, आवक वाढल्याने भावात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी (सुट्टी) : १००-१५०, अस्टर : जुडी १५-२०, सुट्टा : ८०-१२०, शेवंती : ४०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : १००-३००, डच गुलाब (२० नग) : १५०-२५०, जरबेरा : ६०-१००, कार्नेशियन : २००-३००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ९००-१२००, आॅर्चिड ५००- ६००, जिप्सोफिला : २५०-३००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.