पुणे

हिरवा वाटाणा स्वस्त

CD

मार्केट यार्ड, ता. ४ : यंदा हिरव्या वाटाण्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात हिरव्या वाटाण्याच्या भावात किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. यंदा वाटाण्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

बाजारात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून नवीन वाटाणा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. यंदा वाटाण्याचे उत्पादन चांगले झाले आहे. मागील चार वर्षांपासून हिरव्या वाटाण्यावर आयात बंदी कायम आहे. त्यामुळे किलोचा भाव २०० ते २२० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर बाजारात मोठी आवक झाल्यानंतर किलोचा भाव १०० ते १५० रुपये झाला होता. आता देशातील वाटाणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. सद्य:स्थितीत घाऊक बाजारात हिरव्या वाटाण्याचा प्रतिकिलोचा भाव ८० ते १०० रुपये तर, पांढऱ्या वाटाण्याचा भाव ४५ ते ५० रुपये किलो आहे, असे व्यापारी ईश्‍वर नहार यांनी नमूद केले.

नहार म्हणाले, ‘‘नवीन वाटाण्याची आवक आणखी तीन ते साडेतीन महिने सुरू असणार आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज ४० ते ५० टन हिरवा वाटाणा व ४० ते ५० टन पांढरा वाटाणा येत आहे. अनेक खाद्यपदार्थांत वाटाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांकडून वर्षभर मागणी असते.’’

यंदा वाटाण्याचे उत्पादन चांगले असल्याने भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील चार वर्षांपासून वाटाणा आयातीवर बंदी आहे. आयात बंदीची मुदत फेब्रुवारी महिन्यापर्यंत होती. आयात बंदी उठणार की कायम राहणार याबाबत अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही.
- ईश्‍वर नहार, व्यापारी, मार्केट यार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT