पुणे

मासळीचे भाव तेजीत

CD

मार्केट यार्ड, ता. १३ : देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील बाजारात मासळी दाखल होत आहे. मासळीचे गतआठवड्यातील तेजीतील भाव कायम आहेत. तसेच चिकन, मटण आणि अंड्यांचे भावही स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १२ टन, खाडीची मासळी ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कटला आणि सिलनची १५ टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)- पापलेट : कापरी : १६००, मोठे : १६००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६५०-७५०, सुरमई : ६००-९००, रावस : लहान : ७५०-९५०, मोठा : ९००-१०००, घोळ : ८००-९००, करली : ३६०-४००, करंदी (सोललेली) : ४४०-४८०, भिंग : ३६०-४००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी : १०००-१२००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : ३००-४००. कोळंबी : लहान : २५०-३००, मोठी : ३६०-६००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७५०-८५०, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३००-३६०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२८०, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ६००-७००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : ३२०-३६०, नगली : ६००-७००, तांबोशी : ५००-६००, पालू : ३००-३५०, लेपा : ३००-३५०, बांगडा : १४०-२५०, शेवटे : ४००, पेडवी : १२०-१४०, बेळुंजी : १८०-२००, तिसऱ्या : ३००-३५०, खुबे : १००-१६०, तारली : २००-२४०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ३००-५००, शिवडा : २००-२५०, खवली : २५०-३००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : ३५०-४००, चिलापी : ८०-१८०, वाम : ५००-६००.

मटण : बोकडाचे : ७८०, बोलाईचे : ७८०, खिमा : ७८०, कलेजी : ८२०.
चिकन : २२०, लेगपीस : २७०, जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : ३२०.
अंडी : गावरान (शेकडा) : ९८०, डझन : १३०, प्रतिनग : ११.
इंग्लिश (शेकडा) : ४६५, डझन : ७२, प्रतिनग : ६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT