पुणे

नारळाच्या उत्पन्नात २५ टक्क्यांनी घट अनियमित हवामानाचा फटका ः शेकड्यामागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ

CD

मार्केट यार्ड, ता. १६ : अनियमित हवामानामुळे नारळाच्या उत्पादनात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारातील किमतीवर झाला आहे. मागील सहा ते सात महिन्यांत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २०-३० रुपयांना मिळणारा नारळ आता ४०-५० रुपयांना मिळत आहे.
श्रावण आणि गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह येणाऱ्या सणामुळे बाजारात नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दोन ते अडीच लाख नारळांची आवक सध्या होत आहे. उत्पन्न कमी असल्याने नारळांचा पुरवठाही कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दरांमध्ये शेकड्यामागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत मागणी कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवाढीमुळे जे ग्राहक आधी चार नारळ खरेदी करत होते. ते आता केवळ दोन नारळांवर समाधान मानत असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन हजार पोती नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात शंभर नारळ असतात. मार्केटयार्डातून पुणे शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील ग्राहक नारळाची खरेदी करत आहेत.

नारळाचा असा होतो वापर

धार्मिक आणि स्वयंपाक ः ५० टक्के
तेल काढणे ः ३० टक्के
नारळातील पाण्यासाठी ः १० टक्के
वाळलेल्या खोबऱ्यासाठी ः ८ टक्के
औद्योगिक मूल्यवर्धन ः २
---------

हॉटेल व्यावसायिकांकडूनही मागणी
उत्सवाच्या कालवधीत खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीही या जातीच्या नारळांना मागणी असते.
----------
येथून होते आवक
महाराष्ट्रात आंध्र प्रदेशातून पालकोल नारळाची, तर कर्नाटकातून सापसोल आणि मद्रास नारळाची बाजारात आवक होत आहे. तमिळनाडूतून नवा नारळाची आवक होते.
----------------

‘‘कीटकांचा प्रादुर्भाव व अनियमित हवामान उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे आगामी काळातही किमती स्थिर राहतील की आणखी वाढतील, याबाबत बाजारात अनिश्चितता आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात आवकही कमी आहे. सण आणि उत्सव सुरू असल्याने नारळाला चांगली मागणी असून, दिवाळीपर्यंत मागणी कायम असणार आहे.
- दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केटयार्ड.
-----------------
-- दरवाढीची कारणे --
- देशभरात नारळाचे उत्पन्न २५ टक्क्यांनी घटले
- गोटा खोबऱ्याला प्रचंड मागणी
- मागील दोन- तीन वर्षात नारळावर रोगराई
- सततचा पाऊस आणि वातावरणामुळे उत्पादनात घट
- येणाऱ्या सणांमुळे मागणीत प्रचंड वाढ
- नवीन उत्पादनाला सहा-सात महिने बाकी
- मागील वर्षात नारळाच्या निर्यातीत वाढ
- महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यांतून नारळाला मागणी
---------
कोवळ्या नारळांची मागणी
देशभरात कोवळ्या नारळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लवकर पैसे मिळत असल्याने शेतकरी कोवळ्या नारळांची काढणी करत आहेत. त्यामुळे परिपक्व उत्पादनात आणखी घट झाली. देशात सुक्या नारळाची पावडर, नारळाचे दूध, व्हर्जिन नारळ तेल इत्यादी उद्योगांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे किमती वाढण्यास आणखी हातभार लागला.
---------
घाऊक बाजारातील नारळाचे शेकड्याचे दर

- प्रकार -- जून २०२५ -- जुलै २०२५
- नवा नारळ -- २००० ते २२०० -- २६०० ते २७००
- साऊथ नारळ -- २१०० ते २२०० -- २८०० ते २९००
- मद्रास -- ४२०० ते ४७०० -- ४७०० ते ५२००
- पालकोल -- २४०० ते २५०० -- २७५० ते २८५०
- सापसोल मोठा -- ४२०० ते ५२०० -- ४५०० ते ५६००
- सापसोल मीडियम -- २१०० ते ३०० -- २५०० ते ३५००
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: भाजपचा दृष्टिकोन लज्जास्पद; ममता,भाजप बंगालींना त्रास देत असल्याचा आरोप

Viral Video: माणूस अन् माकडाची अनोखी मैत्री ! जिंकली लाखो लोकांची मने, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Solapur Crime : 'पांगरी येथे सव्वालाखांची दारू केली नष्ट'; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, दारूमुक्तीसाठी पुढाकार

Dinesh Karthik: लॉर्ड्सवर जितेश शर्माला खरंच सिक्युरिटी गार्डने अडवलं? कार्तिकने सांगितलं Viral Video मागील खरी कहाणी

Odisha News: ओडिशात जोरदार निदर्शने; न्याय मिळेपर्यंत लढा! सौम्याश्रीच्या मृत्यूने ओडिशा ढवळले, बीजेडीचा सचिवालयावर मोर्चा रोखला

SCROLL FOR NEXT