पुणे

कोबी, शिमला मिरची, शेवगा, घेवड्याच्या भावात वाढ

CD

मार्केट यार्ड, ता. ३१ : गणेशोत्सव आणि गौराईमुळे फळभाज्यांची आवक काहीशी कमी झाली होती, परंतु मागणी चांगली असल्याने कोबी, शिमला मिरची, शेवगा, घेवड्याच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, इंदूर येथून गाजर ९ ते १० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा २ ते ३ टेम्पो, तमिळनाडूतून तोतापुरी कैरी १ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात व कर्नाटकमधून भुईमूग शेंग ५ ते ६ टेम्पो, तसेच मध्यप्रदेशातून लसणाची सुमारे ९ ते १० टेम्पो, तर इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची ४० ते ४५ टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, मटार ४०० ते ५०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १२०-१५०, बटाटा : १२०-१७०, लसूण : ३००- ३५०, आले सातारी : ३००-५००, भेंडी : २०-४००, गवार : ३००-५००, टोमॅटो : २००-३००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १५०-२००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १००-१५०, वांगी : २००-४००, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ४००- ५००, तोंडली : कळी : ३५०-४००, जाड : १८० -२००, शेवगा : ६००-७००, गाजर : १५०-३००, वालवर : ४००, बीट : १००-१२०, घेवडा : ६००-७००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-६००, मटार : स्थानिक मटार : ८०० ते १०००, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १४००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

शेपू, चाकवत, अंबाडीच्या भावात वाढ
गौराई पूजनासाठी लागणाऱ्या भाज्यांची मार्केट यार्ड बाजारात आवक चांगली झाली होती. मागणी जास्त असल्याने शेपू, चाकवत, अंबाडीचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढले होते. सणामुळे भाज्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक स्थिर होती. तर इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (ता. २४) कोथिंबिरीची सुमारे १ लाख २५ हजार जुडी, तर मेथीची ६० हजार जुडींची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ८००-१५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००- ७००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१५००.

मागणीमुळे फळांचे भाव स्थिर
गणेशोत्सव आणि गौरी आगमनासाठी सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात बहुतांश सर्व फळांची आवक चांगली झाली. मागणीमुळे कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंबाचे भाव वाढले आहेत. आवक वाढल्याने सफरचंदाचे भाव घटले होते. आवक-जावक कायम असल्याने इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते.

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (ता. ३१) मोसंबी ८० ते ९० टन, संत्री १० ते १२ टन, डाळिंब ६० ते ७० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबाची सुमारे ६०० ते ८०० गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो , खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू २५०० डाग, पेरू ६०० ते ७०० क्रेट, अननस ५ ट्रक, बोरे १० ते १५ पोती, सफरचंद ८ ते १० हजार बॉक्स, तर सीताफळाची १० ते २० टन इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२८०, (४ डझन) : ४०-१२०, संत्री : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : १२-२०, खरबूज : २५-४०, पपई : ३०-४०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३००-४००, अननस (१ डझन): १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०, बोरे (१० किलो) : चमेली २००-२५०, चेकनट : ९००-१०००, उमराण : ७००-७५०, चण्यामण्या : ७००-७५०, सफरचंद : (२२ ते २५ किलो) : १०००-२२००.

गौरी आगमनासाठी सजावटीच्या फुलांना मागणी
मराठा आरक्षणामुळे मुंबईत वाहतूक कोंडीच्या भीतीने बंगळूर, बीड आदी भागातून मुंबईला जाणारी फुलांची आवक पुण्याकडे वळाल्याने पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात दुपटीने आवक वाढली होती. परिणामी फुलांच्या भावात काहीशी घसरण झाली होती. गौरी आगमनामुळे शोभिवंत फुलांना चांगली मागणी होती. बाजारात दाखल फुलांपैकी ५० टक्के फुले ही भिजलेली असल्याने त्यास कवडीमोल भाव मिळत होते. तर सुकलेल्या आणि दर्जेदार फुलांना मागणी जास्त असल्याने त्यांचे भाव वाढल्याची माहिती मार्केट यार्डातील फुलांचे आडतदार सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-१००, गुलछडी : ४००-१५००, अ‍ॅष्टर : जुडी २०-५०, सुट्टा १५०-३००, कापरी : ६०-१००, शेवंती : १००-३००, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ३०-६०, गुलछडी काडी : ८०-२००, डच गुलाब (२० नग) : १५०-२५०, जरबेरा : ८०-१२०, कार्नेशियन : २००-३००, शेवंती काडी : २५०-३५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१२००, ऑर्किड : ४००-८००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : १५०-२५०, जुई : १२००-१३००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT