मार्केट यार्ड, ता. १० : बाजारात केशर आंब्याचा हंगाम सुरू आहे. रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात तब्बल ७५० ग्रॅम वजनाचा ‘गोल्डन केशर’ प्रथमच दाखल झाला. आकर्षक रंग, मोठा आकार आणि ताजेपणामुळे या आंब्याने व्यापारी आणि ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
फळ व्यापारी युवराज काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी (काची) या गाळ्यावर या विशेष दर्जाच्या केशर आंब्याची आवक झाली. ‘गोल्डन केशर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जातीची फळे उत्तम प्रतीचे असून, शेतकऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्याची जोपासना केल्याचे दिसून येत होते. मोठ्या आकाराच्या या आंब्यांना पाहण्यासाठी गाळ्यावर व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी बाजारात सुमारे तीन टन केशर आंब्याची आवक झाली. त्यात १४ ट्रेमध्ये ७५० ग्रॅम वजनाची फळे होती. या आंब्याला प्रतिकिलो तब्बल १२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. तुलनेने मध्यम आकाराच्या फळांना प्रतिकिलो १०१ रुपये, तर लहान आकाराच्या फळांना सुमारे ७५ रुपये दर मिळाल्याची माहिती युवराज काची यांनी दिली. हा केशर आंबा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील शेतकरी सुखदेव चव्हाण यांच्या बागेतून बाजारात दाखल झाला. बाजारातील व्यापारी परेश शहा यांनी या आंब्याची उच्चांकी भावात खरेदी केली. या वेळी प्रकाश भडकुंबे, सरफराज, सोनू बागवान, शरद कोकरे, बाळासाहेब जाधव, अन्वर शेख, अरविंद यादव आदी व्यापारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.